एक्सप्रेस वेवर नको ते करणाऱ्या महिलेबाबत मोठा खुलासा, नेत्याचा नवा दावा

Viral Video News : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवर अश्लील कांड करणाऱ्या नेताजीबाबत अनेकांना माहिती असेलच. त्यांचे अनेक अश्लील व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. याच व्हिडिओवरुन अनेक दावे करण्यात आले आहेत. नेताजीने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होत आहे.

Viral Video News big revelation about a woman doing something inappropriate on the expressway

Viral Video News big revelation about a woman doing something inappropriate on the expressway

मुंबई तक

29 May 2025 (अपडेटेड: 29 May 2025, 07:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एक्सप्रेसवरील अश्लील व्हिडिओ प्रकरणी नवा ट्विस्ट

point

महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर दबाव

Manohar Lal Dhakad Video : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अश्लील कांड करणाऱ्या नेताजीबाबत अनेकांना माहिती असेलच. त्यांचे अनेक अश्लील व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. याच व्हिडिओवरुन आता नेताजीने अनेक दावे केले आहेत. नेताजीने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होत आहे. अनेक घटनांचे फोटोज् समोर आल्याने संबंधित फोटो आता व्हायरलही होताना दिसतात. असेही लोक आहेत ज्यात इतर कोणत्याही महिलेचे फोटो पोस्ट करत अफवा पसरवण्याचे काम सुरू असताना दिसत आहे.   

हे वाचलं का?

हेही वाचा : भर मंडपात होणाऱ्या पत्नीवर नवऱ्याने गोळीच झाडली, 'ती' असं बोलली तरी काय?

धाकड नेत्याबाबत एसपी काय म्हणाले? 

संबंधित महिलेला सोशल मीडियावर जे काही बोललं जात आहे ते साफ खोटं असल्याचं मंदसौरच्या एसपींशी बोलताना नेत्याने सांगितलं आहे. एसपींनी स्पष्टपणे सांगितलं की, ते सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. मनोहरलाल धाकड हे चौकशीदरम्यान आपल्या भूमिकेवर आणि वक्तव्यावर ठाम नाहीत. ते भूमिका बदलण्याचा प्रयत्न करत असल्याची महिलेबाबत कोणतीही माहिती नाही. 

व्हिडिओतील महिला शिक्षिका, सूत्रांनी दिली माहिती 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहरलाल धाकड यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती एक शिक्षिका आहे. ती एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवते. याच महिलेला दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी पोस्टिंग करायची होती. यामुळे तिने मनोहर लाल धाकडवर विश्वास ठेवला आणि ती धाकडच्या भुलथापांना बळी पडली. 

मध्य प्रदेशातील पोस्टिंगच्या कामाविषयी नेताजी धाकड अनेकदा बोलले होते. पण त्यात काहीही एक तथ्य नाही. दरम्यान, मनोहरलाल धाकड यांच्या पत्नी भाजप समर्थित जिल्हा पंचायत सदस्या म्हणून कार्यरीत आहेत. मनोहर लाल धाकड यांनाही मोठ्या नेत्यांशी संवाद साधावा लागतो. मनोहरलाल धाकड यांचे भाजप नेत्यांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

हेही वाचा : शुभमन गिलच्या कर्णधारपदानंतर... रवींद्र जडेजा म्हणाला, मला व्हायचंय...

दरम्यान, संबंधित व्हायरल व्हिडिओतील महिला सध्या चर्चेत आहेत. धाकडप्रमाणेच महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस आता त्या महिलेचाही शोध घेतायत. महिलेला तात्काळ अटक करावी असा पोलिसांवर दबाव आणला जात आहे. 

    follow whatsapp