नवऱ्याचा पाठलाग करत त्या घरात गेली अन्... पाहते तर काय? नेमकं काय घडलं? पाहा...

मेरठमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एके दिवशी नवरा त्याच्या भाड्याच्या खोलीत जात असताना त्याची पत्नी त्याच्या मागे गेली. महिला तिच्या पतीच्या खोलीत गेली तेव्हा तिथलं दृश्य पाहून तिला मोठा धक्का बसला.

नवऱ्याचा पाठलाग करत त्या घरात गेली अन्... पाहते तर काय?

नवऱ्याचा पाठलाग करत त्या घरात गेली अन्... पाहते तर काय?

मुंबई तक

• 05:42 PM • 19 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याचा पाठलाग करत त्या घरात गेली

point

नवऱ्याला त्या अवस्थेत पाहून पत्नीला बसला मोठा धक्का

point

मेरठमधील धक्कादायक बातमी

Meerut News: मेरठमधील नौचंडी पोलीस स्टेशन परिसरातील फूल बाग कॉलनीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहित पुरूष भाड्याच्या खोलीत राहत होता. एके दिवशी तो त्याच्या खोलीत जात असताना त्याची पत्नी त्याच्या मागे गेली. महिला तिच्या पतीच्या खोलीत गेली तेव्हा तिथलं दृश्य पाहून तिला मोठा धक्का बसला. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.

हे वाचलं का?

खरंतर, सायमा आणि नासिर यांचा 2016 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी दोघांनीही त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं आणि दोघांनाही दोन गोड मुली होत्या. आपल्या आयुष्यात खूप आनंद असल्याचं सायमाला वाटत होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून, नासिरचं वागणं बदलत चाललं होतं. नासिर रात्री उशिरा घरी परतायचा, तासन्तास फोनवर व्यस्त असायचा आणि सायमाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करायचा. त्यामुळे नासिरचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा सायमाला संशय येऊ लागला. 

मैत्रिणीनेच नासिरबद्दल सांगितलं

एके दिवशी सायमाला तिच्या मैत्रिणीकडून नासिर फूल बाग कॉलनीतील त्याच्या भाड्याच्या घरात एका तरुणीसोबत असल्याचं कळालं. हे ऐकून सायमा नासिरच्या मागे गेली. दुपारी नासिर घराबाहेर पडल्यानंतर सायमा गुपचूप त्याच्या मागे गेली. नासिरचा पाठलाग करत ती त्याच्या घरात पोहचली. सायमाने दार ठोठावले आणि दार उघडताच तिला नासिर रुखसाना नावाच्या एका तरुणीसोबत दिसला. 

हे ही वाचा: नाशिकमध्ये पूर.. धडकी भरवणारी दृश्य, पावसाचं थैमान! पुण्यातही पावसाचा धुमाकूळ

त्या दोघांना पाहून सायमाचा राग अनावर झाला आणि 'काय चाललंय?' असं तिने नासिरला ओरडून विचारलं. यावर नासिरला धक्काच बसला. त्यावेळी रुखसानानेही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सायमाने तिला गप्प केले. रागाच्या भरात सायमाने रुखसानावर हात उचलला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. आवाज ऐकून शेजारी बाहेर येऊ लागले. सायमाने सर्वांना नासिरबद्दलचे सत्य सांगितले.

हे ही वाचा: मुंबईची खबर: साठ्ये कॉलेजमध्ये खळबळ! इमारतीवरुन विद्यार्थीनीने मारली उडी; नेमकं कारण काय?

पोलिसात तक्रार दाखल 

यानंतर सायमाने नौचंडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत सायमाने नासिर आणि रुखसानाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. नासिरने स्पष्ट केले की त्याला ना सायमासोबत राहायचे आहे ना रुखसानासोबत. त्याला एकटं राहायचं आहे, असं नासिरने सांगितलं. 

    follow whatsapp