UP Love Story Viral Video : सासू अनिता आणि जावई राहुल यांच्या लव्ह स्टोरी संपूर्ण देशभरात खळबळ माजवली आहे. आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे दावा केला जात आहे की, सासू अनिता प्रेग्नंट झाली आहे. अनिता देवी आणि राहुल दोघेही सोबत फरार झाले होते. ते अनेक दिवस एकत्र राहिले होते. त्यानंतर ते दोघे पोलिसांसमोर हजर झाले.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर अनिताच्या प्रेग्नन्सीबाबत दावा केला जात आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंटरनेटवर म्हटलं जात आहे की, आठवतंय ना जावयासोबत पळून जाणापी सासू..आता अनिता प्रेग्नंट झाली आहे. पोलील तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले आहेत. माहित नाही, कलियुगात आणखी काय काय पाहायचं बाकी आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, सासू अनिताला पोलीस रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले आहेत.
हे ही वाचा >> वयाच्या 61 व्या वर्षी भाजपचा 'हा' नेता करणार लग्न; कोणासोबत बांधणार लग्नगाठ, थक्क करणारी Love Story
सासू अनिता खरंच प्रेग्नंट झाली आहे का?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत केलेल्या दाव्याची पडताळणी यूपी तकने केलीय. व्हिडीओ पाहू शकता की, महिला पोलीस कर्मचारी सासू अनिताला रुग्णालयात घेऊन जात आहेत. रुग्णालयात अनिता बसली आहे. अनिता प्रेग्नंट झाल्यानंतर पोलीस तिला रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले, असा दावा केला जात आहे.
परंतु, या व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर समोर आलं की, तो व्हायरल व्हिडीओ त्या दिवशीचा आहे, ज्या दिवशी अनिता आणि राहुलने पोलिसांकडे सरेंडर केलं होतं. त्या दिवशी अनिताला मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात नेलं होतं. अलिगढ पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा >> कामाची बातमी: तुमच्याकडे देखील नाही जन्माचा दाखला? या '5' टिप्स वापरा अन् मिळवा Birth Certificate
ADVERTISEMENT
