वयाच्या 61 व्या वर्षी भाजपचा 'हा' नेता करणार लग्न; कोणासोबत बांधणार लग्नगाठ, थक्क करणारी Love Story
भाजप पक्षातील नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 61 व्या वर्षी लग्न करणार आहेत आणि त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वयाच्या 61 व्या वर्षी भाजपचा नेता करणार लग्

दिलीप घोष कोणासोबत लग्नबंधनात अडकणार?

वयाच्या 61 व्या वर्षी लग्न करण्याचं काय कारण?
कोलकाता: प. बंगालचे भाजप पक्षातील नेते दिलीप घोष हे नेहमीच राजकीय विश्वात त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. मात्र, दिलीप घोष त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा पार करणार आहेत. तो म्हणजे प्रेम आणि सहवासाचा. पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी लग्न करणार आहेत आणि त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मात्र, ही बाब केवळ लग्नाची नाही. तर ही कहाणी एकाकीपणा, समजूतदारपणा आणि आधाराच्या पायावर उभ्या असलेल्या नात्याची आहे. रिंकू मजुमदार या एक वरिष्ठ भाजप कार्यकर्त्या असून दिलीप घोष यांच्या होणाऱ्या पत्नी आहेत. रिंकू यांनी पक्षासाठी महिला मोर्चा, ओबीसी विंग आणि हातमाग क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
नात्याची सुरूवात कशी झाली?
या प्रेमळ नात्याची सुरुवात एका राजकीय पराभवाने झाली. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिलीप घोष थोडे निराश झाले होते, तेव्हा रिंकूनेच त्यांना त्यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली. त्या म्हणाल्या, "आपण दोघेही एकटे आहोत, आपण एकत्र पुढे का जाऊ नये?" सुरुवातीला घोष यांनी नकार दिला, पण त्याच्या आईची इच्छा आणि त्याच्या एकटेपणामुळे याबाबतीत त्यांनी विचार केला.
हे ही वाचा: राहुल गांधी अमेरिकेत गेले अन् महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून 'असं' काही बोलले की...
रिंकू यांच्यासोबत IPL मॅच बघण्यासाठी गेले दिलीप घोष
रिंकू यांचा आधी घटस्फोट झाला असून आणि त्यांना एक मुलगा आहे जो IT क्षेत्रात काम करतो. अलिकडेच, दिलीप घोष, रिंकू आणि त्यांचे कुटुंब कोलकातामधील ईडन गार्डन्सवर KKR संघाचा सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं.