कामाची बातमी: तुमच्याकडे देखील नाही जन्माचा दाखला? या '5' टिप्स वापरा अन् मिळवा Birth Certificate

मुंबई तक

भारत सरकारने अशी सुविधा तयार केली आहे, ज्याच्या साहाय्याने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र मिळवू शकता. तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय ऑनलाइन अर्ज करू शकता आणि तुमचे महत्त्वाचे कागदपत्र सहज मिळवू शकता. घरबसल्या जन्म प्रमाणपत्र बनवण्याच्या 'या' सोप्या टिप्स जाणून घ्या.

ADVERTISEMENT

जन्म दाखला मिळविण्याच्या टिप्स
जन्म दाखला मिळविण्याच्या टिप्स
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जन्म प्रमाण मिळवण्याच्या काही सोप्या टिप्स

point

जन्म दाखला नसल्यास काय करावं?

point

घरबसल्या जन्म प्रमाणपत्र कसं डाउनलोड करावं?

Birth Certificate: आजच्या डिजिटल युगात भारत सरकारने अशी सुविधा तयार केली आहे, ज्याच्या साहाय्याने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र मिळवू शकता. तुम्हाला शाळेत प्रवेश घ्यायचा असेल, पासपोर्ट मिळवायचा असेल किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, जन्म प्रमाणपत्र हे एक आवश्यक कागदपत्र आहे. तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय ऑनलाइन अर्ज करू शकता आणि तुमचे महत्त्वाचे कागदपत्र सहज मिळवू शकता. घरबसल्या जन्म प्रमाणपत्र बनवण्याच्या 'या' सोप्या टिप्स जाणून घ्या.

जन्म दाखल्यासाठी अर्ज कुठे कराल?

भारत सरकारच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट crsorgi.gov.in वर जाऊन तुम्ही जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता. जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

हे ही वाचा: पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?, पैसा हेच कारण!

1. रजिस्ट्रेशन करा

  • सर्वात आधी crsorgi.gov.in वर जा.
  • होमपेज वर 'General Public Sign Up' या पर्यायावर क्लिक करा.
  • फॉर्म उघडल्यानंतर त्यात तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, राज्य, जिल्हा आणि गावाचं किंवा शहराचं नाव अशा डिटेल्स भरुन घ्या.
  • सर्व माहिती भरुन झाल्यावर 'Register' वर क्लिक करा.
  • यानंतर, तुमच्या ईमेलवर एक व्हेरिफिकेशन लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर क्लिक करुन अकाउंट सक्रिय करा.

2. लॉगिन करा आणि फॉर्म भरा

  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा होमपेजवर जा आणि आपली यूजर आयडी आणि पासवर्डवरुन लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर Birth (Add Birth Registration) टॅबवर क्लिक करा.
  • एक फॉर्म उघडल्यानंतर तिथे तुम्हाला मुलाचे नाव (नमूद केल्यास), जन्म तारीख आणि वेळ, जन्म ठिकाण (रुग्णालयाचे नाव आणि पत्ता, किंवा जन्म घरी झाला असेल तर घरचा पत्ता), पालकांची नावे आणि त्यांचे ओळखपत्र (जसे की आधार कार्ड), रुग्णालयाचे जन्मपत्र (लागू असल्यास) असे डिटेल्स भारावे लागतील.

3. डॉक्यूमेंट्स अपलोड करा

अर्जाचा फॉर्म भरल्यानंतर त्यात खालील डॉक्यूमेंट्सच्या स्कॅन कॉपी अपलोड करा.

हे वाचलं का?

    follow whatsapp