मुंबई : कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बिझनेसमन महिलेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन् कपडे काढले अन्..धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : मुंबई : कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बिझनेसमन महिलेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन् कपडे काढले अन्..धक्कादायक प्रकार

Mumbai Crime

Mumbai Crime

मुंबई तक

01 Dec 2025 (अपडेटेड: 01 Dec 2025, 01:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बिझनेसमन महिलेच्या डोक्यावर बंदूक रोखली

point

अन् कपडे काढले अन्..धक्कादायक प्रकार

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महालक्ष्मी परिसरातील एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये 51 वर्षीय बिझनेसमन महिलेला रिवॉल्वरच्या धाकावर धमकावत कपडे उतरवून छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

घटनेनुसार, 17 जानेवारी 2023 रोजी पीडितेला मनीष होनावर याचा फोन आला आणि तिने मेसर्स फ्रॅन्को इंडियन फार्मास्युटिकल्स प्रायवेट लिमिटेड या महालक्ष्मीतील ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. तक्रारीनुसार, ऑफिसमध्ये पोहोचताच एका व्यक्तीने तिच्यावर अचानक रिवॉल्वरच्या बटने हल्ला करून तिच्या खांद्यावर व पाठीवर मारहाण केली. यानंतर आरोपी जॉय जॉन पास्कल पोस्टेल याने तिला आपल्या केबिनमध्ये नेले. तिथे रिवॉल्वरची नळी लावून तिचे कपडे जबरदस्तीने काढण्यात आले. त्यानंतर तिची छेडछाड करण्यात आली. तक्रारीत महिला म्हणते की, आरोपी सतत शिवीगाळ करत होता आणि मागे उभे असलेल्या इतर आरोपींनी तिचे फोटो व व्हिडिओ काढण्याची धमकी दिली. हे फोटो सोशल मीडियावर टाकू, असे सांगत तिच्यावर मानसिक दडपणही आणण्यात आले.

हेही वाचा : निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सुरुवातीला पीडितेने पायधोनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नंतर ही तक्रार एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. 22 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी संबंधित प्रकरणात औपचारिक FIR नोंदवली. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह आर्म्स अ‍ॅक्ट आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता ही फोटो-फ्रेम आणि गिफ्टिंग व्यवसायाशी संबंधित उद्योजिका असून ती महालक्ष्मी परिसरात राहते. तिच्या तक्रारीतील माहिती आणि प्राथमिक तपासात उघड झालेल्या तथ्यांच्या आधारे पोलिसांनी जॉय जॉन पास्कल पोस्टेल आणि पाच इतर संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी आणि संपूर्ण घटना उलगडण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असून घटनेने परिसरातही खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रायगड दर्शनासाठी निघालेल्या सांगलीच्या विद्यार्थिनींची बस पलटली; सहलीला जात असताना दुर्दैवी घटना

    follow whatsapp