रायगड दर्शनासाठी निघालेल्या सांगलीच्या विद्यार्थिनींची बस पलटली; सहलीला जात असताना दुर्दैवी घटना

मुंबई तक

Raigad Accident : रायगड दर्शनासाठी निघालेल्या सांगलीच्या विद्यार्थिनींची बस पलटली; सहलीला जात असताना दुर्दैवी घटना

ADVERTISEMENT

Raigad Accident
Raigad Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रायगड दर्शनासाठी निघालेल्या सांगलीच्या विद्यार्थिनींची बस पलटली

point

सहलीला जात असताना दुर्दैवी घटना

Raigad Accident, महाड : रायगड किल्ल्याच्या सहलीसाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थिनींना घेऊन जाणारी खासगी मिनीबस महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रूक परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात पलटली. या दुर्घटनेत चार विद्यार्थिनींसह शिक्षक आणि बसचालक जखमी झाले असून, एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे. पहाटे सुमारे पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमधील 16 विद्यार्थिनी शिक्षण सहलीसाठी रायगडावर जात होत्या. शैक्षणिक पर्यटनाचा भाग म्हणून त्यांनी खासगी मिनीबसने महाडकडे प्रवास सुरू केला होता. मात्र महाड शहराच्या हद्दीत प्रवेश करताच चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटले आणि मिनीबस रस्त्याच्या कडेला पलटली. धडाकेबाज आवाजाने आसपासच्या नागरिकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

हेही वाचा : पुणे : विवाहित महिलेचा लग्न कर म्हणून तगादा, प्रियकराने गळा दाबून संपवलं, मृतदेह धाराशिवमध्ये पेट्रोल टाकून जाळला

अपघातात अक्षरा ढोकळे (वय 16), आदिती खेरमोडे (16), आदिती खाडे (16), सिद्धी ढोकळे (16) या विद्यार्थिनी तसेच शिक्षक जगन्नाथ येवले (45) आणि चालक योगेश जाधव (35) हे जखमी झाले. सर्वांना तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर विद्यार्थिनी आदिती खेरमोडे हिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत तिला पुढील उपचारांसाठी महाड उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

हे वाचलं का?

    follow whatsapp