पुणे : विवाहित महिलेचा लग्न कर म्हणून तगादा, प्रियकराने गळा दाबून संपवलं, मृतदेह धाराशिवमध्ये पेट्रोल टाकून जाळला
Pune Crime : पुणे : विवाहित महिलेचा लग्न कर म्हणून तगादा, प्रियकराने गळा दाबून संपवलं, मृतदेह धाराशिवमध्ये पेट्रोल टाकून जाळला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : विवाहित महिलेचा लग्न कर म्हणून तगादा
प्रियकराने गळा दाबून संपवलं
मृतदेह धाराशिवमध्ये पेट्रोल टाकून जाळला
पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातून एका विवाहित महिलेच्या खूनप्रकरणाने खळबळ उडाली आहे. राणी विशाल गायकवाड (वय 30) या महिलेची तिच्याच विवाहित प्रियकराकडून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित अनिकेत महादेव कांबळे (रा. पिंपरी-चिंचवड) याला वाकड पोलिसांनी अटक केली असून तपासात अत्यंत थरारक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणी गायकवाड आणि अनिकेत कांबळे हे दोघेही विवाहित असून त्यांना मुले आहेत. काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. राणी हिच्या घरी या नात्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्यावर घरच्यांनी दबाव आणायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर राणी सतत अनिकेतला सोबत राहण्याबाबत आणि लग्नाबाबत आग्रह करत होती. या दबावामुळेच अनिकेतने तिची हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
अनिकेतने 27 नोव्हेंबर रोजी राणीला फोन करून फिरायला जाण्याचे सांगितले. कारने बाहेर पडले असताना दोघांमध्ये पुन्हा लग्न आणि सोबत राहण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. आधीच हत्या करण्याचा प्लान तयार करून ठेवलेल्या अनिकेतने कारचा मोर्चा धाराशिव जिल्ह्याकडे वळवला. कार ढोकी गावाजवळ पोहोचल्यावर राणी झोपलेली असताना अनिकेतने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर वार करीत मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने त्या मृतदेहावर पेट्रोल ओतून आग लावली.










