'मंत्रिमंडळात आता जागाच...', जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, चर्चेला पूर्णविराम
Devendra Fadnavis on Jayant Patil : 'मंत्रिमंडळात आता जागाच...', जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, चर्चेला पूर्णविराम
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मंत्रिमंडळात आता जागाच उरलेली नाही'
जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, चर्चेला पूर्णविराम
Devendra Fadnavis on Jayant Patil, Sangli : सांगलीतील ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या कथित प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट भूमिका मांडली. “मंत्रिमंडळात आता कोणतीही रिक्त जागा नाही. आमच्या पक्षातील आमदारांनाही मंत्रिपद देणे शक्य नसताना बाहेरील कोणालाही सामावून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीसांनी पाटील यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चांना थेट विराम दिला. ईश्वरपूरमध्ये रविवारी संध्याकाळी महात्मा गांधी चौकात महायुतीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्थानिक पातळीवर या अफवांमुळे निर्माण झालेली चिंता अनाठायी आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा विषयच नाही, त्यामुळे या चर्चांना काहीच आधार नाही.”










