निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई तक

Devendra Fadnavis on Local body election : निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis on Local body election
Devendra Fadnavis on Local body election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला"

point

निवडणुका पुढे ढकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणाले?

Devendra Fadnavis on Local body election : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका न्यायालयीन कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरवड्यापासून ज्या ठिकाणी प्रचाराचा जोरदार माहोल होता, तिथे निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मंदावला आहे. ज्या भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यांचा नवीन कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मतदान 20 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडणार आहे. दरम्यान, उर्वरित ठिकाणांमध्ये निवडणुका आधी ठरल्याप्रमाणेच 2 डिसेंबर रोजी नियोजित वेळेनुसार होतील. या संपूर्ण निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : पुणे : विवाहित महिलेचा लग्न कर म्हणून तगादा, प्रियकराने गळा दाबून संपवलं, मृतदेह धाराशिवमध्ये पेट्रोल टाकून जाळला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका आहेत आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आता पुढील टप्पा सुरू झाला असून, काही ठिकाणी संपूर्ण नगरपालिका/नगरपंचायतींसाठी तर काही ठिकाणी केवळ प्रभागांसाठीचे मतदान २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जातील. ज्या नगरपालिका किंवा नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे, त्या प्रभागांतील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. तसेच ज्या ठिकाणी अध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात याचिका दाखल आहे, त्या ठिकाणी संपूर्ण नगरपालिका किंवा नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करून तिथे आता 20 डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे. आक्षेपांवरील निर्णय देताना झालेला विलंब, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला मर्यादित कालावधी आणि त्याचदरम्यान उमेदवारांना वितरित झालेली चिन्हे यांसारख्या कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने या काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुका 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला पार पडणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp