Mumbai Metro 11 Extension : मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो 11 ग्रीन लाईन ही आता थेट वांद्रे टर्मिनस पर्यंत धावणार आहे. या नव्या प्रकल्पासाठी जपानकडून 5,500 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. यासाठी भारत सरकार आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था यांच्यात करार झाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल.
ADVERTISEMENT
कसा असेल नवा मार्ग?
मेट्रो 11 ही ग्रीन लाईन सध्या वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत जाते. या नव्या प्रकल्पामुळे ही लाईन आता धारावीमार्गे वांद्रे टर्मिनस पर्यंत जाणार आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम उपनगरांमध्ये प्रवासाची जलद आणि पर्यावरणपूरक सुविधा निर्माण होईल. हा प्रस्तावित मार्ग 6.9 किमी लांबीचा असणार आहे. या विस्तारानंतर 5 नवीन स्थानके तयार होतील. हा मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई पोर्ट वॉटरफ्रंटला जोडला जाणार आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचं दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता, महत्त्वाचा अलर्ट
कधी सुरु होणार?
या प्रस्तावित कामाची सुरुवात 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2032 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी 23,487 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 5,500 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जपानकडून मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फक्त प्रवासाची सुविधाच नाही तर मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
हे ही वाचा : Personal Finance: चांदी तब्बल 15,000 रुपयांनी घसरली... सोनंही गडगडलं! पण असं घडतंय तरी का?
कसा आहे मूळ मार्ग?
मेट्रो 11 ही ग्रीन लाईन वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत जाते. ही लाईन 17.51 किमी लांबीची आहे. यामध्ये एकूण 14 स्थानके प्रस्तावित आहेत आणि बहुमतांशी स्थानके ही भूमिगत आहेत. नव्या विस्तारानंतर यामध्ये अजून 5 स्थानकांची भर पडेल.
ADVERTISEMENT











