Personal Finance: चांदी तब्बल 15,000 रुपयांनी घसरली... सोनंही गडगडलं! पण असं घडतंय तरी का?
Gold Silver Updates Price: कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
ADVERTISEMENT

Personal Finance tips for Gold Silver Price: रामनवमीमुळे 26 मार्च रोजी भारतीय शेअर बाजार बंद होता. मात्र, कमोडिटी मार्केट सायंकाळी 5 वाजता उघडलं आणि ते रात्री 11.30 पर्यंत सुरू होतं. कमोडिटी मार्केट उघडताच मल्टी कमोडिटी मार्केट (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात जबरदस्त घसरण झाली. चांदीचा भाव हा काही क्षणातच 15,000 रुपये प्रति किलोने घसरला. त्याचप्रमाणे, सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली.
सायंकाळी 7 वाजता, MCX वर सोन्याचा भाव 3,000 रुपयांपेक्षा जास्त घसरून 1.40 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. बुधवारच्या बंद भावाच्या तुलनेत सोन्याच्या दरात 2% पेक्षा जास्त घसरण झाली. दरम्यान, मे महिन्याच्या वायद्यांमधील चांदीचे भाव जवळपास 15,000 रुपयांनी घसरून 2.20 लाख रुपये प्रति किलोच्या खाली आले. बुधवारच्या तुलनेत चांदीच्या भावात 6 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
सोन्या-चांदीच्या दरात इतकी मोठी घसरण का झाली?
अमेरिका आणि इराण यांच्यातील परिस्थिती अस्पष्ट आहे. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी 15 अटी ठेवल्या, ज्या इराणने फेटाळल्या. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, हा प्रस्ताव स्वीकारण्यास विलंब केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. या वक्तव्यामुळे भू-राजकीय धोका वाढला आहे.
दुसरीकडे, इराणने म्हटले आहे की, लष्करी कारवाई केल्यास किंवा दबाव आणल्यास, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीसोबतच बाब अल-मंडाबचा चोकपॉईंटही बंद करू शकते, ज्यामुळे जागतिक पुरवठ्यात आणखी व्यत्यय येईल. या घटकांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.









