मुंबईची खबर : मुंबईकरांना झटका! टोलच्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर

मुंबई तक

• 03:23 PM • 01 Oct 2026

मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यांवरील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. हे बदललेले दर नेमके कसे आहेत, जाणून घ्या सविस्तर.

Mumbai News 

Mumbai News 

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबईकरांना झटका!

point

टोलच्या दरात मोठी वाढ

point

पाहा नवे दर

Mumbai News  : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर असलेल्या टोलनाक्यांवरील टोलच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच एक ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर ऐरोली, वाशी, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर हे पाच टोलनाके आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही वाढ केली आहे.

हे वाचलं का?

कसे असतील बदललेले दर?

या बदललेल्या दरांनुसार, अवजड वाहनांसाठी 225 रुपये टोल आकारला जाणार आहे. मिनी बस आणि एलसीव्ही वाहनांसाठी 90 रुपये; तर ट्रक आणि बसेससाठी 180 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे. यापूर्वी 2023 साली ऑक्टोबरमध्ये टोलचे दर बदलण्यात आले होते. त्यानुसार अवजड वाहनांसाठी 190 रुपये, मिनी बससाठी 75 रुपये; तर ट्रक आणि बससाठी 150 रुपये आकारले जात होते.

हे ही वाचा :  कोल्हापूर : वडिलांच्या मित्राने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने चिमुकलीला पंचगंगा नदीकडे नेलं अन्...

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईत 55 उड्डाणपूल उभारले आहेत. या पूलांच्या  बांधकामाचा खर्च वसुलीसाठी ऐरोली, वाशी, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर हे पाच टोलनाके उभारण्यात आले आहेत. ही वसुली सप्टेंबर 2029 पर्यंत सुरु राहणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीपासून  बेस्ट बस, एसटी, हलकी आणि शालेय वाहने यांना टोल आकारला जात नाही. मात्र इतर वाहनांना टोल आकारला जातो. 

हे ही वाचा : “विमानात तुम्हाला कोण वाचवणार?” एक वर्षापूर्वीचं 'ते' विधान ठरलं खरं, भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ व्हायरल!

अतिरिक्त शुल्काचा फटका

वाढलेल्या शुल्काचा विचार करता जुन्या दरांमध्ये जवळपास वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, पुणे, नाशिक आणि  राज्याच्या इतर भागांतून भाजीपाला, फळे आणि इतर मालांची देवाणघेवाण या भागातून होत असते. टोलचे दर वाढल्याने वाहनचालकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. याचा फटका अखेर ग्राहकांना बसणार असल्याचे  बोलले जात आहे.