पुणे: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर बुधवारी (12 ऑगस्ट) 3 तास वाहतूक बदल करण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्ती आणि मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
मिसिंग लिंक नेमकी किती वेळ बंद?
12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत देखभाल-दुरुस्तीची कामे तसेच मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे.
वाहनांना जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून वळवणार
मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका बंद असताना सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळवण्यात येणार आहेत.
हे ही वाचा>> पुण्याची गोष्ट : मिसिंग लिंकचे दोन महिन्यापूर्वी उद्घाटन, पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे
त्यामुळे या तीन तासांच्या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका सुरू
दरम्यान, मिसिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे केवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर या वाहतूक बदलाचा परिणाम होणार आहे.
हे ही वाचा>> पुणे–मुंबई जाणार आहात? आधी ही बातमी वाचा; एक्स्प्रेसवे, जुना महामार्ग बंद.. मुसळधार पावसाचा कहर
अडचण आल्यास कुठे संपर्क कराल?
या कालावधीत वाहनचालकांना काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी किंवा महामार्ग पोलीस विभागाशी संपर्क साधता येईल.
ADVERTISEMENT












