मुंबईकरांनो सांभाळा, पुढील काही तास तुफान पाऊस.. समुद्रानजीक Rain Bands सक्रिय

मुंबई तक

• 08:32 PM • 11 Aug 2026

मुंबईत संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर Rain Bands सक्रिय असून काही ठिकाणी मुसळधार, तर अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

mumbai rain alert rain bands heavy rain evening 11 august 2026

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: चॅटजीपीटी

Google CTA

मुंबई: मुंबईकरांसाठी हवामान आणि पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात Rain Bands सक्रिय असून पुढील काही तासात मुंबईतील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार

सायंकाळी 4.10 वाजताच्या अपडेटनुसार, मुंबईच्या किनारपट्टीवर पावसाचे अनेक पट्टे तयार झाले आहेत. या Rain Bands मुळे काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तास ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Weather : वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांत वादळीवाऱ्यासह पाऊस घालणार धुमाकूळ

विशेष म्हणजे, पावसाचा जोर सर्व भागात सारखा न राहता काही ठिकाणी अचानक मुसळधार सरी कोसळू शकतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

मुंबईचे हवामान कसे राहणार?

सध्याच्या अंदाजानुसार मुंबईत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना जोरदार पावसाचा सामना करावा लागू शकतो.

हे ही वाचा>> Pune: मिसिंग लिंकबाबत मोठी अपडेट, प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा नाहीतर होईल घोळ!

मुंबईकरांनी काय काळजी घ्यावी?

  • अत्यावश्यक काम नसेल तर जोरदार पावसाच्या काळात बाहेर पडणे टाळावे.
  • दुचाकीस्वारांनी विशेष काळजी घ्यावी.
  • सखल भागातून वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी.
  • समुद्रकिनारी जाणे टाळावे.
  • पावसाचा जोर वाढल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
  • प्रवास करण्यापूर्वी रस्ते आणि वाहतुकीची स्थिती तपासावी.
  • अचानक जोरदार सरींची शक्यता

मुंबईत पावसाचे स्वरूप अनेकदा स्थानिक पातळीवर बदलते. त्यामुळे एका भागात हलका पाऊस असताना दुसऱ्या भागात जोरदार किंवा मुसळधार पाऊस पडू शकतो. किनारपट्टीवर सक्रिय असलेल्या Rain Bands मुळे पुढील काही तास अशाच पावसाच्या सरींची शक्यता आहे.