मुंबईची खबर : मासळी बाजारात मासे कापण्यावर BMC ने निर्बंध लादले का? रितू तावडेंनी काय सांगितलं?

मुंबईतील मासळी बाजारात मासे कापण्यावर महापालिकेने निर्बंध लादल्याच्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र त्या बातम्या अपप्रचाराचा भागअसल्याचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 03:56 PM • 07 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मासळी बाजारात मासे कापण्यावर BMC ने निर्बंध लादले का?

point

रितू तावडेंनी काय सांगितलं?

Mumbai News : मुंबईतील मासळी बाजारात मासे कापण्यावर महापालिकेने निर्बंध लादल्याच्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र त्या बातम्या अपप्रचाराचा भाग असल्याचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले. आज रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजाराला भेट दिली. त्यावेळी मासे कापण्यावर कोणतेही निर्बंध लादण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 'मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त' या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

रितू तावडे यांची पोस्ट जशीच्या तशी 

'मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त' आज सकाळी वाकोला येथील मासळी बाजाराला भेट देऊन आपल्या कोळी भगिनींशी आणि बांधवांशी संवाद साधला. वाकोला सह मुंबईतील कोणत्याही मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. काही प्रसारमाध्यमांमधून पसरवण्यात आलेल्या मनाईच्या बातम्या या अपप्रचाराचा भाग आहेत. त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

मुंबईचे मूळ नागरिक असलेल्या कोळी समाजाच्या पाठीशी मी स्वतः आणि संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. सर्वांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय सुरू ठेवावा. आजच्या भेटीत कोळी भगिनींनीही कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. तरीही कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा- प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी मी स्वतः तत्पर आहे.'

हे ही वाचा : Govt Jobs : पदवीधरांसाठी आनंदाची बातमी, राष्ट्रीयकृत बँकेत भरती जाहीर; लगेच करा अर्ज

काय होती 'ती' बातमी?

वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यास महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनाकडून मनाई केल्याचा कथित आरोप करणारे वृत्त विविध प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमातून प्रसारित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रितू तावडे यांनी भेट वाकोला मासळी बाजाराला भेट दिली.