Govt Jobs : पदवीधरांसाठी आनंदाची बातमी, राष्ट्रीयकृत बँकेत भरती जाहीर; लगेच करा अर्ज

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांसाठी कामाची सुवर्णसंधी चालून आली आहे. अप्रेंटिससाठी 1865 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 19 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Government Jobs

Government Jobs

मुंबई तक

07 May 2026 (अपडेटेड: 07 May 2026, 03:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : पदवीधरांसाठी आनंदाची बातमी

point

'या' राष्ट्रीयकृत बँकेत भरती जाहीर

point

लगेच करा अर्ज

Government Jobs : युनियन बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिसच्या 1865 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून, यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी 98 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 29 एप्रिल पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 19 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असून याद्वारे तरुणांना बँकिंग क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक अर्हता काय?

या पदासाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराचे वय किमान 20 ते कमाल 28 इतके असावे. या प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणानुसार दरमहा विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. ग्रामीण आणि निमशहरी भागातील उमेदवारांना 15,000 रुपये, शहरी भागातील उमेदवारांना 18,000 रुपये, तर मेट्रो शहरांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेसाठी 1 एप्रिल 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली असून, उमेदवारांनी या तारखेपर्यंत आपली शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी रगेल आरोपीच्या थेट पायावरच झाडल्या गोळ्या!

'अशी' केली जाणार निवड?

निवड प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने दोन टप्प्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा नैपुण्य चाचणी घेतली जाईल. ही ऑनलाइन परीक्षा मे किंवा जूनमध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित राज्याची स्थानिक भाषा येते का ते तपासले जाईल, जेणेकरून ग्राहकांशी संवाद साधताना कोणतीही अडचण येणार नाही.

हे ही वाचा : 219 कॉल्स अन् दगडाने ठेचून हत्या, वहिनीच्या प्रेमात दीर आकंठ बुडाला, कुणाचा झाला शेवट?

'असा' करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने 'BFSI SSC' पोर्टलद्वारे भरायचे आहेत. अर्जाशी संबंधित अधिक माहिती, सविस्तर पात्रता आणि अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.unionbankofindia.co.in) भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.