होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी रगेल आरोपीच्या थेट पायावरच झाडल्या गोळ्या!
UP Crime News : सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी बबलू सिंह याला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली असून, त्याच्या दोन्ही पायांना गोळी लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर बलात्कार
आरोपीला पकडताना..., भयंकर घडलं!
UP Crime News: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून, गेल्या 13 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी बबलू सिंह याला पोलिसांनी एका थरारक चकमकीनंतर अटक केली आहे. 24 एप्रिल रोजी एका तरुणीवर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप 28 वर्षीय बबलू सिंह याच्यावर होता. या घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना तातडीने जेलमध्ये पाठवले होते, मात्र मुख्य आरोपी बबलू सिंह फरार होता. त्याच्या अटकेसाठी प्रशासनाने 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर रात्री उशिरा झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळ्या बबलूच्या दोन्ही पायांना लागल्या असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आरोपीला पकडताना दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार, काय घडलं?
आरोपी बबलू सिंह पकडला जात नसल्याने पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याने एक व्हिडिओ जारी करून पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी आरोपीला पकडण्याऐवजी आपल्यालाच घरात बंदी बनवून ठेवल्याचे त्याने म्हटले होते, मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे करण्यात आल्याचे केल्याचे स्पष्ट केले होते. मुख्य आरोपी पकडला जात नसल्याने वाढता दबाव पाहता पोलिसांनी बबलूच्या अटकेसाठी खागा, हतगाव, थरियाव आणि एसओजी (SOG) या चार पथकांची संयुक्त टीम तयार केली होती. रात्रीच्या वेळी आरोपीच्या लोकेशनची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराची पूर्णपणे नाकेबंदी केली. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
हेही वाचा : डोंबिवली हादरलं! मित्राचा रुग्णालयात मृत्यू, आई-वडील बाहेरगावी असताना तरुणानं गळफास घेत संपवलं जीवन
चकमकीनंतर शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोलीस चकमकीत जखमी झालेल्या बबलू सिंहला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. आरोपीकडे 4 रिकामी काडतुसे आणि बंदुकीच्या नालीत अडकलेले एक जिवंत काडतूस सापडले आहे. याशिवाय त्याच्याकडून 1600 रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस यंत्रणेला आव्हान देणारा नराधम अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही चकमक इतकी प्रखर होती की बराच वेळ गोळीबार सुरू होता, मात्र पोलिसांनी योग्य रणनीती आखून आरोपीला जखमी अवस्थेत जेरबंद केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ex-IAF officer, सुवेंदू अधिकारींचे राईट हँड बनले, मर्डर झालेले Chandranath Rath कोण होते?
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू; 13 दिवसांचा तपास यशस्वी









