डोंबिवली हादरलं! मित्राचा रुग्णालयात मृत्यू, आई-वडील बाहेरगावी असताना तरुणानं गळफास घेत संपवलं जीवन
Dombivali Suicide : डोंबिवली पश्चिम परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका तरुणाने मित्राच्या मृत्यूची बातमी ऐकून गळफास घेत आत्महत्या केली, या घटनेनं घटनास्थळ हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोंबिवली पश्चिम परिसरात धक्कादायक घटना
मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ
नेमकं प्रकरण काय?
Dombivali Suicide : डोंबिवली पश्चिम परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उमेशनगर परिसरात शिव दीप निवास चाळ, नील कमल बंगल्याजवळ राहणाऱ्या लोकेश सूर्यकांत निकम (वय 31) नावाच्या तरुणाने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेले आहे, या मन हेलावून टाकणाऱ्या प्रकरणाने घटनास्थळी एकच खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : शाळेच्या मार्कशीटवर खाडाखोड; बापाने 9 वर्षाच्या चिमुरडीचा मशिनने चिरला गळा
मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ
घडलेल्या घटनेनुसार, 5 मे 2025 रोजी रात्री कल्याणच्या आधारवाडी कारागृहात लोकेशचा मित्र ऋषिकेशच्या छातीत अचानकपणे वेदना होऊ लागल्या होत्या. त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार वेळेवर न दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. मात्र, या घटनेनंतर ऋषिकेशचा मित्र लोकेश निकमचा एका खोलीत मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास केल्यानंतर लोकेशचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती उघडकीस आली.
आई-वडिलांना भलताच संशय
लोकेश हा एका प्रिंटींग प्रेसमध्ये नोकरी करत होता, त्याचे अद्याप लग्न देखील झाले नव्हते. घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील सातारा येथे गेले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी लोकेश फोन उचलत नसल्याने त्याच्या आई-वडिलांना भलताच संशय बळावला. याचदरम्यान शेजाऱ्यांनी संपर्क साधत चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा : 'ते' एक स्वप्न अन् 'या बड्या नेत्यांचा' राजकारणात गेम ओव्हर! असं नेमकं काय घडलं?
मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत
अशातच विजय सावंत यांनी लोकेशच्या घरी जाऊन पाहणी केली. घराजवळ पोहोचताच कोणीही नव्हते तेव्हा दुर्गंध सुटला होता. यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता, मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला होता. मृतदेह पोलिसांनी खाली उतरवून पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत नंतर शवविच्छेदनासाठी पाठवला होता.









