ex-IAF officer, सुवेंदू अधिकारींचे राईट हँड बनले, मर्डर झालेले Chandranath Rath कोण होते?

मुंबई तक

Who was Chandranath Rath : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी -IAF अधिकारी चंद्रनाथ रथ यांची उत्तर २४ परगणा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Who was Chandranath Rath
Who was Chandranath Rath
google news

बातम्या हायलाइट

point

ex-IAF officer, सुवेंदू अधिकारींचे राईट हँड बनले

point

मर्डर झालेले Chandranath Rath कोण होते?

Who was Chandranath Rath : पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात मोठे नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ (वय 41) यांची बुधवारी रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात निर्घृण हत्या करण्यात आली. भारतीय हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या रथ यांचा प्रवास इंटरेस्टिंग राहिलाय. पूर्व मेदिनीपूरमधील चंडीपूर येथील रहिवासी असलेल्या रथ यांचा कल सुरुवातीला आध्यात्मिक जीवनाकडे होता आणि ते रामकृष्ण मिशनच्या शिस्तीत वाढले होते. मात्र, हवाई दलात जवळपास दोन दशके सेवा केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले आणि त्यानंतर हळूहळू ते शुभेंदु अधिकारी यांच्या कोअर टीमचा भाग बनले. त्यांच्या हत्येमुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात प्रचंड तणाव निर्माण झाला असून या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हवाई दलातील सेवेपासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास; सुवेंदू अधिकारींचे बनले 'संकटमोचक'

चंद्रनाथ रथ यांचे कुटुंब पूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते आणि त्यांच्या मातोश्री हसी रथ यांनी स्थानिक पंचायतीमध्ये पदही भूषवले होते. मात्र, 2020 मध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच या कुटुंबानेही भाजपमध्ये प्रवेश केला. रथ यांनी 2019 मध्ये अधिकारी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली होती, जेव्हा अधिकारी ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. सुरुवातीला कार्यालयीन समन्वय आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या रथ यांनी अल्पावधीतच भाजपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. संवेदनशील राजकीय जबाबदाऱ्या, निवडणूक मोहिमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यात ते निष्णात मानले जात होते. भवानीपूर सारख्या हाय-प्रोफाइल निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती, ज्यामुळे ते अधिकारी यांच्या गोटातील एक उगवते नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

हेही वाचा : बायकोने हात धरले, प्रियकराने घोटला गळा अन् नंतर...निवृत्त लष्करी जवानाला कसे संपवले?

हे वाचलं का?