Jalna Crime : गौरव साळी - जालना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीने अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्षे ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील 25 वर्षीय पीडितेने पारध पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एक कुटुंब, तीन आमदार, तीन पक्ष..'या' कुटुंबाला लागला जॅकपॉट
2016 पासून पीडितेचे अश्लील फोटो काढून अनेक वर्षे ब्लॅकमेल
पारध पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शेख इम्रान शेख हबीब पिंजारी (वय 37) या विवाहित इसमाने 2016 पासून तिचे अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्षे ब्लॅकमेल केले. तक्रारीनुसार, पीडित तरुणी अल्पवयात असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिचा अर्धनग्नावस्थेत तिचा फोटो काढला होता. नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती.
धमकी देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप
दरम्यान, आरोपी 2017 पासून संभाजीनगर येथे जाऊन तिला धमकी देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले आणि नंतर तक्रार दाखल केल्याचा आरोप करण्यात आला. एवढंच नाही,तर नराधम आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
2018 मध्ये आरोपीच्या कुटुंबीयांनीही पीडितेला धर्मांतर करण्यासाठी दबाव
दरम्यान, आरोपीने पीडितेला त्याच्या धर्माचे कुराण पठण करण्यास भाग पाडले. तसेच नमाज कशी अदा करायची हे देखील शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच तिला उर्दू आणि मराठी भाषेतील कुराण देण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे त्या पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. 2018 मध्ये आरोपीच्या कुटुंबीयांनीही पीडितेला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचा पीडितेचा आरोप आहे.
हे ही वाचा : Astrology : सूर्याच्या राशीबदलाची मोठी भूमिका, 'या' राशींना धनलाभ आणि पदोन्नती होणार
8 मार्च 2026 रोजी जालना शहरातील जांगडानगर येथे आरोपीने पुन्हा घरात घुसून मारहाण केली, नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पीडितेनं दिली. या प्रकरणात शेख इम्रान हबीब पिंजारी यांच्यासह त्याचे वडील, आई आणि भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परिस्थिती पाहून पारध पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT











