Govt Jobs : फक्त एक परीक्षा आणि मिळणार 60 हजारांहून अधिक पगार, 'असा' करा अर्ज

'कोल इंडिया लिमिटेड' मध्ये विविध पदांच्या एकूण 660 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, पगार किती आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Government Jobs

Government Jobs

मुंबई तक

• 04:04 PM • 06 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : फक्त एक परीक्षा आणि मिळणार 60 हजारांहून अधिक पगार,

point

'असा' करा अर्ज

Government Jobs : 'कोल इंडिया लिमिटेड'ने मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या एकूण 660 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड केवळ 'कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन टेस्ट' (CBT) म्हणजेच संगणकीय परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार असून, यासाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 'E-1' ग्रेडमध्ये समाविष्ट केले जाईल, ज्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे.

हे वाचलं का?

'असा' करा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या इंजिनिअरिंगच्या विविध शाखेत कमीत कमी 60 टक्क्यांसह डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच राजभाषा या विभागात अर्ज करण्यासाठी हिंदी विषयातून 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच कंपनी सेक्रेटरी या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि सीएस पूर्ण केले असावे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांना कोल इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.coalindia.in) जाऊन 'Career with CIL' या विभागांतर्गत अर्ज करावा लागेल.

हे ही वाचा : अकोला : आई-वडील मजूरीला गेले अन् घडलं भयानक, 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अर्ज कधी सुरु होणार ?

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 12 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 जून पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. वयोमर्यादेची गणना करण्यासाठी 30 एप्रिल आधारभूत दिनांक मानली जाईल, त्यामुळे उमेदवारांनी आपले वय आणि शैक्षणिक पात्रता तपासून विहित मुदतीत अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : 'ते' एक स्वप्न अन् 'या बड्या नेत्यांचा' राजकारणात गेम ओव्हर! असं नेमकं काय घडलं?

'इतका' पगार मिळणार

या पदांसाठी वेतनश्रेणी अत्यंत आकर्षक असून, निवडलेल्या उमेदवारांना 60,000 ते 1,80,000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना दरमहा 60,000 रुपये मूळ वेतन दिले जाईल. याव्यतिरिक्त महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि 'कॅफेटेरिया अप्रोच' अंतर्गत मिळणारे विविध भत्ते व 'परफॉर्मन्स रिलेटेड पे' (PRP) यांसारख्या सुविधाही लागू असतील. यशस्वीरीत्या एक वर्षाचा प्रशिक्षण आणि प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना संबंधित विभागात 'अधिकारी' (Officer) म्हणून कायमस्वरूपी नियुक्त केले जाईल.

हे ही वाचा : एक कुटुंब, तीन आमदार, तीन पक्ष..'या' कुटुंबाला लागला जॅकपॉट

परीक्षा कधी होणार?

परीक्षेचे स्वरूप आणि तारखेबाबतची सविस्तर माहिती उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक लॉगिन पोर्टलवरून डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्राद्वारे (Admit Card) दिली जाईल. भरतीशी संबंधित सर्व अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी कोल इंडियाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीविना थेट अधिकारी होण्याची ही मोठी संधी असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.