Kalyan prisoner suspicious death : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऋषिकेश पवार असे मृत कैद्याचे नाव असून, जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
ADVERTISEMENT
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पवार हा डोंबिवली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याला आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा : अकोला : आई-वडील मजूरीला गेले अन् घडलं भयानक, 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
छातीत दुखू लागल्यानंतर चार तासाने रुग्णालयात
दरम्यान, काल सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश यांच्या छातीत दुखू लागले. मात्र, त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्याऐवजी तब्बल चार तास उशिराने, साडेनऊ वाजता उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांना रुग्णवाहिकेऐवजी जेल प्रशासनाच्या खाजगी बोलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले.
हे ही वाचा : एक कुटुंब, तीन आमदार, तीन पक्ष..'या' कुटुंबाला लागला जॅकपॉट
नातेवाईकांचा आंदोलनाचा इशारा
वेळेवर उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. तसेच न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
ADVERTISEMENT











