Maharashtra Weather : राज्यात उष्णतेत वाढ होऊ लागली आहे, या उन्हाच्या चटक्यामुळे अनेकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागानुसार, 6 मे 2026 रोजी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दोन जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यांत कोणताही अलर्ट जारी केला नसला तरीही, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज...
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जनरेटरचं डिझेल तपासण्यास गेली महिला, पंख्यात ओढणी अडकल्याने गळफास बसला, महिलेवर काळाचा घाला
कोकण
कोकण विभागात हवामान विभागाने उष्णतेच्या तीव्रतेचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच याच विभागातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच विभागात दमट हवामानामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. काही भागांमध्ये दुपारी अधिक उष्ण वारे वाहण्याची चिंता आहे. सोलापूर जिल्ह्यात काही प्रमाणात वातावरणात बदल घडण्याची शक्यता आहे. या भागात कोणताही अलर्ट नसला तरीही अवकाळी हलक्या स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा अधिक चटका जाणवेल. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर परिसरात मध्यम स्वरुपाचं तापमान राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात आणि लातूर जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट़ जारी करण्यात आला. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांच्या पावसाची अधिक शक्यता आहे. नांदेडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : भाच्याने मामाच्या 14 वर्षांच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार, गुप्तांगाला नको तेच... लाज आणणारी घटना
विदर्भ
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. दुपारी उष्णतेची लाट जाणवेल अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT











