जनरेटरचं डिझेल तपासण्यास गेली महिला, पंख्यात ओढणी अडकल्याने गळफास बसला, महिलेवर काळाचा घाला
Viral News : महिला जनरेटमधील डिझेल तपासण्यासाठी गेली असता, तिला आपला जीव गमवावा लागला. डिझेलची तपासणी केली असता, महिलेची ओढणी त्या जनरेटरमध्ये अडकली, त्याचदरम्यान तिच्या ओढणीचा फास बसला आणि डोक्याला जबर मार लागला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला जनरेटमधील डिझेल तपासण्यासाठी गेली असता, तिला आपला जीव गमवावा लागला
महिलेची ओढणी नरेटमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास लागून दुर्दैवी मृत्यू
Viral News : महिला जनरेटमधील डिझेल तपासण्यासाठी गेली असता, तिला आपला जीव गमवावा लागला. डिझेलची तपासणी केली असता, महिलेची ओढणी त्या जनरेटरमध्ये अडकली, त्याचदरम्यान तिच्या ओढणीचा फास बसला आणि डोक्याला जबर मार लागला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचादराम्यान तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, जिल्हा परिषद शिक्षकाचा मर्डर, मैत्रिणीचा अघोरी सल्ला अन् बायकोची सुपारी; कारण काय?
नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, लोधिमा परिसरातील रहिवासी महिला अनिशा तिग्गा (वय 27) अशी महिलेची ओळख समोर आली. या घटनेनंतर तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर दोन दिवस उपचार सुरु होते, मात्र दोन दिवसानंतर तिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. महिला एका वर्षांपासून एका रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होती.
डिझेलची पातळी पाहण्यासाठी गेलेल्या महिलेची ओढणी अडकून मृत्यू
शनिवारी वातावरण बदलल्याने अनिशा जनरेटरचे डिझेलची पातळी पाहण्यासाठी गेली. जनरेटर सुरू असताना डिझेलची पातळी तपासताना तिची ओढणी जनरेटरमध्ये अडकली. त्या ओढणीचा फास तिच्या गळ्याला बसला, नंतर महिला जनरेटरला धडकली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. महिलेचा आवाज ऐकून जनरेटरजवळ काही कर्मचारी तिथे आले. अनिशाला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा : खाकीला बट्टा! पोलीस कॉन्स्टेबलचे तरुणीशी 5 वर्षे शरीरसंबंध, लग्नास नकार दिला अन् गाडी घेण्याच्या नावाने नको तेच...
या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ माजली. कुटुंबियांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले, सुरक्षारक्षकाने जनरेटरचे काम करणे हे चुकीचे आहे. चुकीच्या व्यक्तीला चुकीची जबाबदारी आणि हेच निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचं बोललं जातंय. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाची कारवाई केली. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे.









