खाकीला बट्टा! पोलीस कॉन्स्टेबलचे तरुणीशी 5 वर्षे शरीरसंबंध, लग्नास नकार दिला अन् गाडी घेण्याच्या नावाने नको तेच...

मुंबई तक

crime news : एका पोलीस कॉन्स्टेबलवर महिलेने लग्नाचे आमिष दाखवून तिचे पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अशातच पीडितेनं आरोप केला की, त्याने खोटं सांगून लाखो रुपये उकळले. हे प्रकरण समोर येताच, पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. अशातच आरोपी पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाचे आमिष आणि शरीरसंबंध

point

गाडी घेण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उधळले

point

पोलीस कॉन्स्टेबलचं राक्षसी कृत्य

Crime News : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बांदा जिल्ह्यात तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर महिलेने लग्नाचे आमिष दाखवून तिचे पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. अशातच पीडितेनं आरोप केला की, त्याने खोटं सांगून लाखो रुपये उकळले. हे प्रकरण समोर येताच, पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. अशातच आरोपी पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : Astrology : रुचक राजयोगाची सुरुवात होणार, 'या' राशींना होणार मोठा फायदा

लग्नाचे आमिष आणि शरीरसंबंध, गाडी घेण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उधळले

पीडितेच्या आरोपानुसार, 2021 मध्ये कालिंजर पोलीस ठाण्यात तैनात असलेले एक हवालदार तिच्या दुकानात वारंवार यायचा. तिचा आरोप आहे की, त्याने तिला प्रेमप्रकरणात अडकवले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. या काळात त्यांच्यात शारीरिक संबंध झाले होते. पीडितेनं आरोप केला की, त्याने तिला घर आणि गाडी घेऊन देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून दोन लाख रोख रक्कम आणि दीड लाखांचे दागिने घेतले, परंतु तिला परत केले नाहीत. 

शरीरसंबंध ठेवून विवाहास नकार आणि पीडितेला धमकवण्याचा प्रयत्न

कॉन्स्टेबलची हमीरपूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर, त्याने त्या महिलेला बांदा येथे आणून तिथे ठेवले. जेव्हा त्या महिलेनं त्याच्याशी विवाह करण्यास दबाव टाकला असता, आरोपी कॉन्स्टेबलने स्पष्टपणे नकार दिला. पीडितेनं दावा केला की, तो कॉन्स्टेबल म्हणतो की, तिला केवळ वेळ घालवण्यासाठी सोबत ठेवले होते आणि ती तिच्याशी लग्न करणार नाही. पीडितेनं एक ऑडिओ रेकॉर्ड व्हायरल केला, ज्यात तो कॉन्स्टेबल तिला धमकावत असल्याचा आरोप आहे. जर तक्रार केली तर तो तिला खोट्या गुन्ह्यात अडकवेल आणि संपूर्ण घराची राख रांगोळी करेल.  

हे ही वाचा : बीड : 1 नवरी अन् 8 ते 9 नवरदेव?.., भयंकर प्रकार; एवढ्या जणांशी कसं केलं लग्न?

अशातच बांदाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, कॉन्स्टेबलविरुद्ध तक्रारीची तक्रारीची गंभीर चौकशी केली. हे प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत आरोपी कॉन्स्टेबलविरुद्ध कायदेशीर आणि विभागीय कारवाई सुरु करण्यात आली.  

हे वाचलं का?