मुंबईची खबर : कधी सुरु होणार मोनोरेल? मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार का?

मोनोरेल सेवा पूर्ववत होण्यासाठी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने 7 मे ही डेडलाईन दिली होती. मात्र सुरक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणी अद्याप सुरू न झाल्यामुळे हा विलंब होत आहे.

Mumbai Monorail News

Mumbai Monorail News

मुंबई तक

• 05:16 PM • 06 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : कधी सुरु होणार मोनोरेल?

point

मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार का?

Mumbai Monorail News : मुंबई मोनोरेल सुरू होण्यासाठी मुंबईकरांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. मोनोरेल सेवा पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाने 7 मे ही डेडलाईन दिली होती. मात्र सुरक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणी अद्याप सुरू न झाल्यामुळे हा विलंब होत आहे. त्यामुळे आता चेंबूर ते जेकब सर्कल या  मार्गावरील सेवा मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तांत्रिक बिघाड आणि सुरक्षेच्या कारणास्तव 20 सप्टेंबर 2025 पासून मोनोरेल सेवा स्थगित करण्यात आली होती.

हे वाचलं का?

का बंद पडली होती मोनोरेल?

मोनोरेलमधून दररोज सुमारे 18 हजार ते 20 हजार प्रवासी यातून प्रवास करत असत. मात्र, वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे आणि चाचणी दरम्यान वडाळा डेपोबाहेर झालेल्या एका अपघातामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच सेवा सुरू केली जाईल. मोनोरेल सुरु झाल्यानंतर हैदराबाद मधील पॉवर मेक प्रोजेक्ट्स ही कंपनी पुढील पाच वर्षांसाठी देखभाल करणार आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : फक्त एक परीक्षा आणि मिळणार 60 हजारांहून अधिक पगार, 'असा' करा अर्ज

20 फेब्रुवारीला पहिले प्रमाणपत्र

या प्रकल्पासाठी मेधा सर्वो ड्रायव्हर्स या कंपनीने 10 नवीन गाड्यांची निर्मिती केली असली, तरी ऑपरेशन्स आणि देखभालीचे काम पॉवर मेक प्रोजेक्ट्स या खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. ब्यूरो व्हेरिटास इंडिया या स्वतंत्र सुरक्षा संस्थेकडून 20 फेब्रुवारीला पहिले सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले होते. त्यानंतर मोनोरेलच्या टायरमध्ये आणि सिग्नलिंग यंत्रणेत महत्त्वाचे बदल करून ती अधिक सक्षम करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : कल्याण : आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचे गंभीर आरोप, नेमका कसा झाला मृत्यू?

दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षा तपासणी

दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाची सुरक्षा तपासणी निवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल यांच्यामार्फत केली जाणार आहे. यामध्ये रोलिंग स्टॉक, स्वयंचलित भाडे संकलन गेट्स, सिग्नलिंग आणि टेलिकॉम यंत्रणेची कसून तपासणी होईल. विशेष म्हणजे, मोनोरेलसाठी दुसरी सुरक्षा तपासणी अनिवार्य नसली, तरी गेल्या वर्षी झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही अतिरिक्त तपासणी केली जात आहे.