मुंबईची खबर : मुंबईकरांनो, काळजी घ्या! यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्र खवळणार; बीएसीनं काय सांगितलं?

मुंबई तक

07 Jun 2026 (अपडेटेड: 07 Jun 2026, 01:04 PM)

मुंबईत यंदाच्या मान्सूनच्या हंगामात समुद्र चांगलाच खवळलेला पाहायला मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मुंबईकरांनो काळजी घ्या

point

यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्र खवळणार

point

बीएसीनं काय सांगितलं?

Mumbai News : मुंबईत यंदाच्या मान्सूनच्या हंगामात समुद्र चांगलाच खवळलेला पाहायला मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) याबाबत धोक्याचा इशारा दिला असून, जून ते सप्टेंबर या काळात एकूण 24 वेळा समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यातील सर्वात मोठी भरती (हायटाईड) 16 जुलै रोजी येणार असून, त्यावेळी लाटांची उंची तब्बल 4.89 मीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हायटाईडची शक्यता

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, या चार महिन्यांच्या कालावधीत जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6, ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबर महिन्यात 7 हायटाईड येण्याची शक्यता आहे. यातील मोठ्या भरतीचे पहिले सत्र 14 जून ते 19 जून या काळात राहील. या पहिल्या टप्प्यात समुद्राच्या लाटांची उंची 4.64 मीटर ते 4.87 मीटरच्या दरम्यान असू शकते, ज्यामुळे किनारपट्टीच्या भागात पाण्याचा मोठा जोर पाहायला मिळेल.

हे ही वाचा  : अखेर वडिलांचा संयम संपला, 36 वर्षीय मुलाचा घेतला जीव; कारण काय?

बीएमसीचे निर्देश

पावसाळ्यात येणाऱ्या या उंच लाटा आणि सोसाट्याचा वारा यामुळे समुद्रकिनारी राहणारे नागरिक, मासेमारी करणारे कोळी बांधव आणि पर्यटकांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हायटाईडच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी किंवा बीचवर अजिबात जाऊ नये, असे सक्त निर्देश बीएमसीने दिले आहेत. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे आणि मासेमारी किंवा बोट चालवणाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : आईचं वय 45 अन् प्रियकराचं 23, 15 वर्षीय मुलीला कळताच सगळंच संपलं; काय घडलं?

हायटाईड अन् मुसळधार पावसाचा धोका

या काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शहराने सज्ज राहावे, असे पालिकेने म्हटले आहे. मान्सूनच्या हंगामात हायटाईड आणि मुसळधार पाऊस यांचा दुहेरी धोका कायम असतो, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे हाच यावरील खरा बचाव आहे. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा विनंती केली आहे की, भरतीच्या वेळी समुद्राजवळ जाणे, किनाऱ्यावर फेरफटका मारणे, सेल्फी काढणे किंवा मासेमारी करणे यांसारख्या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात, कारण अचानक उसळणाऱ्या उंच लाटा प्राणघातक ठरू शकतात.