आईचं वय 45 अन् प्रियकराचं 23, 15 वर्षीय मुलीला कळताच सगळंच संपलं; काय घडलं?

मुंबई तक

आईच्या अनैतिक प्रेमसंबंधांची किंमत तिच्या 15 वर्षांच्या निष्पाप मुलीला चुकवावी लागली. आईच्या प्रियकराने मुलीला संपवले आणि जंगलात नेऊन..., जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

आईचं वय 45 अन् प्रियकराचं 23

point

15 वर्षीय मुलीला कळताच सगळंच संपलं

point

काय घडलं?

Crime News : आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अनैतिक प्रेमसंबंधांची किंमत तिच्या 15 वर्षांच्या निष्पाप मुलीला चुकवावी लागली. मृत मुलीच्या आईच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या 23 वर्षीय प्रियकराने मुलीला क्रूरपणे संपवले.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा उलगडा केला तेव्हा सत्य ऐकून अधिकारीही थक्क झाले. राधिका असं या 15 वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. जंगलात जळालेल्या अवस्थेतील तिचा मृतदेह सापडला होता. पंजाबच्या नवाशहर परिसरातील ही घटना आहे.

आईचे गोपीशी अनैतिक संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय आई उषा राणी हिचे तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या गुरविंदर सिंग उर्फ गोपी (23) याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधांमध्ये तिची 15 वर्षांची मुलगी अडथळा ठरत होती. याच रागातून आरोपी गुरविंदरने मुलीला घरात एकटे पाहिले आणि अत्यंत निर्घृणपणे तिचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि जंगलात नेऊन जाळला.

हे ही वाचा : एक्स बॉयफ्रेंड भेटला अन् घडलं भयानक, वकील महिलेने 6 वर्षीय लेकीला का संपवलं?

जंगलात नेऊन जाळला मृतदेह

या भयंकर हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेहाचे तुकडे करण्याच्या हेतूने मुलीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये कोंबला. ती सुटकेस आपल्या दुचाकीच्या मागे बांधून तो घनदाट जंगलात पोहोचला. जंगलात नेऊन आरोपीने सुटकेससह मृतदेहाला आग लावली. बेपत्ता झालेल्या मुलीचा तपास करत असताना पोलिसांना जंगलात राधिकाचा  जळालेला सांगाडा सापडला. 

हे ही वाचा : डोळ्यात मिरचीपूड टाकली अन् दगडानं ठेचलं डोकं, बॉडी बिल्डरला क्रूरपणे संपवलं; बायकोसोबत...

आरोपीला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी गुरविंदर याला तातडीने अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या धक्कादायक कटात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची कसून चौकशी या पोलीस कोठडीदरम्यान केली जात आहे.
 

हे वाचलं का?