अखेर वडिलांचा संयम संपला, 36 वर्षीय मुलाचा घेतला जीव; कारण काय?
ज्या वयात आपला मुलगा आपल्याला सांभाळेल अशी आई-वडिलांची अपेक्षा असते, त्याच वयात वडिलांना एक टोकाचं पाऊल उचलावं लागलं. एका 85 वर्षीय वृद्ध बापाने आपल्या एकुलत्या एक 36 वर्षीय मुलाची हत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अखेर वडिलांचा संयम संपला
36 वर्षीय मुलाचा घेतला जीव
कारण काय?
Crime News : ज्या वयात आपला मुलगा आपल्याला सांभाळेल अशी आई-वडिलांची अपेक्षा असते, त्याच वयात वडिलांना एक टोकाचं पाऊल उचलावं लागलं. एका 85 वर्षीय वृद्ध बापाने आपल्या एकुलत्या एक 36 वर्षीय मुलाची हत्या केली आहे. भगवत असे या मृत मुलाचे नाव आहे. या वयात एक बाप आपल्याच मुलाची हत्या कशी काय करू शकतो, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, या हत्येमागील कारण आणि सत्य परिस्थिती समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील ही घटना आहे.
आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण
ही घटना महोबा जिल्ह्यातील आनंदपुरा बडेरा गावातील आहे. येथे 85 वर्षीय नन्हे भाई आणि त्यांची 80 वर्षीय पत्नी रंभी आपल्या मुलासोबत राहत होते. म्हातारपणी एकुलता एक मुलगा आपला आधार बनेल आणि आपली सेवा करेल, अशी या वृद्ध दाम्पत्याची अपेक्षा होती. परंतु, सत्य याच्या अगदी उलट होते. वृद्ध आई रंभी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवतला दारूचे भयंकर व्यसन होते. तो दररोज दारूच्या नशेत तर्र होऊन घरी यायचा आणि आपल्या असहाय्य आई-वडिलांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करायचा.
हे ही वाचा : आईचं वय 45 अन् प्रियकराचं 23, 15 वर्षीय मुलीला कळताच सगळंच संपलं; काय घडलं?
अखेर वडिलांचा संयम सुटला
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जूनच्या संध्याकाळी देखील भगवत नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने घरात वाद घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता तो आपल्या 80 वर्षांच्या वृद्ध आईच्या अंगावर धावून गेला आणि तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण करू लागला. जेव्हा 85 वर्षांचे वडील नन्हे भाई तिला वाचवण्यासाठी मध्ये पडले, तेव्हा त्याने त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. रोजचा मानसिक व शारीरिक छळ आणि आपल्या पत्नीला मार खाताना पाहून वडिलांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी आपल्या थरथरत्या हातांनी एक काठी उचलली आणि रागाच्या भरात मुलाच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.
हे ही वाचा : एक्स बॉयफ्रेंड भेटला अन् घडलं भयानक, वकील महिलेने 6 वर्षीय लेकीला का संपवलं?
आरोपी अटकेत
घरातून येणारा आरडाओरडा ऐकून शेजारी तातडीने तिथे जमा झाले आणि त्यांनी या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना व रुग्णवाहिकेला दिली. गंभीर जखमी झालेल्या भगवतला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर महोबा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, आरोपी पिता नन्हे भाई यांना अटक करण्यात आली आहे.









