Viral Video : टॅक्सीतून आला, समुद्रात गोणीभर कचरा टाकला! मुंबई पोलिसांनी कार्यक्रमच केला

प्रशांत गोमाणे

• 09:45 AM • 22 Nov 2023

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली होती. या व्हिडिओवर मुंबईकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता आरोपीच्या मुसक्या आळवण्यात आल्या आहेत. आता हे नेमकं प्रकरण काय आहे ? हे जाणून घ्या.

mumbai viral video man dumping trash in sea gate of india mumbai police action

mumbai viral video man dumping trash in sea gate of india mumbai police action

follow google news

Mumbai Viral Video : गेल्या काही दिवसांपुर्वीच म्हणजेच दिवाळीत मुंबईत प्रदुषण (Mumbai Polution) होत असल्याची ओरड सूरू आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबईत प्रदुषण वाढल्याचे बोलले जात होते. ही घटना ताजी असतानाच मुंबईच्या गेट ऑफ इंडिया (Gate Way Of India) समोरील समुद्रात कचरा टाकल्याची घटना घडली होती. या संबंधित व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली होती. या व्हिडिओवर मुंबईकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता आरोपीच्या मुसक्या आळवण्यात आल्या आहेत. आता हे नेमकं प्रकरण काय आहे ? हे जाणून घ्या. (mumbai viral video man dumping trash in sea gate of india mumbai police action)

हे वाचलं का?

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतले ठिकाण हे गेट ऑफ इंडिया होते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक काळ्या पिवळ्या रंगाची टॅक्सी दिसतेय. या टॅक्सीतून एक व्यक्ती बाहेर पडतो आणि गेट ऑफ इंडियाच्या समुद्रात गोणीभर कचरा टाकतो. हा व्यक्ती ज्याप्रमाणे कचरा टाकतोय, त्यामुळे समुद्रात प्रदुषण होत आहे. या व्यक्तीने इतका कचरा टाकलाय की व्हिडिओत दिसणारा समुद्राचा भाग कचऱ्याने व्यापलाय. हा कचरा टाकल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या गाडीतून निघून जातो.

हे ही वाचा : Nawaz Modi: “मला, मुलीला लाथा घातल्या, अंबानींनी वाचवलं”, रेमंडच्या मालकावर पत्नीचे गंभीर आरोप

दरम्यान संबंधित व्यक्ती ही कृती करत असताना एकाही व्यक्तीने त्याला अडवले नाही.अनेकांनी मात्र ही संपुर्ण घटना मोबाईलच्या कॅमेरात कैद केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आणि तो मुंबई पोलिसांना देखील टॅग करण्यात आला होता.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर टीका केली. आरोपीच्या या कृतीला जोरदार विरोध झाला. या विरोधानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली. पोलिसांनी व्हिडिओ फुटेजद्वारे संबंधित टॅक्सीचा नंबर मिळवून त्या टॅक्सीचा चालकाचा पत्ता काढला. त्यानंतर त्या पत्यावर जाऊन पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी मोहम्मद याकूब दुधवालला ताब्यात घेतले आहे. पोलीस आता त्याच्यावर काय कारवाई करते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp