नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं, पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली

योगेश पांडे

17 Feb 2026 (अपडेटेड: 17 Feb 2026, 10:19 AM)

Nagpur Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी मूळची यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून अकरावीत शिक्षण घेत आहे. तिच्या आई-वडिलांनी पोलीस भरतीची तयारी व्हावी म्हणून तिला नागपूरमधील नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत दाखल केले होते. प्रशिक्षणादरम्यान तिची इंस्टाग्रामवरून बिहारमध्ये राहणाऱ्या अकरावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.

Nagpur Crime News

Nagpur Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं

point

पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली

Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने सोशल मीडियावर ओळख झालेल्या प्रियकरासोबत थेट बिहार गाठल्याचा प्रकार उघड झाला आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) तातडीने कारवाई करत मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप परत आणले.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी मूळची यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून अकरावीत शिक्षण घेत आहे. तिच्या आई-वडिलांनी पोलीस भरतीची तयारी व्हावी म्हणून तिला नागपूरमधील नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत दाखल केले होते. प्रशिक्षणादरम्यान तिची इंस्टाग्रामवरून बिहारमध्ये राहणाऱ्या अकरावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.

हेही वाचा : मुंबईतील शिवाजीनगर परिसरात दुपारी गोळीबार, बॉयफ्रेंडशी जवळीकता साधत होती तरुणी, गर्लफ्रेंडनं झटक्यात केलं खल्लास

मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दोघांमध्ये सतत चॅटिंग सुरू होते. दरम्यान, संबंधित मुलाने तिला बिहारला येण्यास सांगितले. मात्र प्रवासासाठी पैसे नसल्याने मुलीने आई-वडिलांकडे अकॅडमीची फी भरायची असल्याचे कारण सांगून सात हजार रुपयांची मागणी केली. पालकांनी विश्वास ठेवून पैसे पाठवले; मात्र तिने ते अकॅडमीत जमा न करता थेट प्रयागराज येथे प्रस्थान केले.

प्रयागराज येथे संबंधित मुलगा तिला भेटला आणि त्यानंतर दोघेही बिहारमधील त्याच्या गावी रवाना झाले. दरम्यान, मुलगी अकॅडमीतून कोणतीही माहिती न देता निघून गेल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने तिच्या पालकांना कळवले. चिंताग्रस्त पालकांनी तात्काळ कोराडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तपास सुरू केला. निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने बिहारमधील महागामा परिसरात धडक दिली. तेथून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन सुखरूप नागपूरला आणण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अल्पवयीन मुलगा व त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील ओळखीमुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक प्रेमसंबंध, नवऱ्याने समजवलं पण तिनं ऐकलं नाही, अखेर विष पिऊन संपवलं जीवन