नागपूर : 64 वर्षीय महिलेवर बैलाने हल्ला केला, पीडितेच्या मेंदूला जबर मार, मृत्यूशी देते झुंज.. Video व्हायरल

योगेश पांडे

26 Feb 2026 (अपडेटेड: 26 Feb 2026, 02:14 PM)

Nagpur News : नागपूरमधील हुडकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील मानवी वस्तीत एका बैलाने वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. वृद्ध महिलेचं नाव  वंदना देवीकर (वय 64) असे आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Nagpur News

Nagpur News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बैलाच्या हल्ल्यात पीडित वृद्ध महिला मृत्यूशी देते झुंज 

point

महिना उलटून गेला तरी प्रकृती चिंताजनक

Nagpur News : नागपूरमधील हुडकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील मानवी वस्तीत एका बैलाने वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. वृद्ध महिलेचं नाव  वंदना देवीकर (वय 64) असे आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंझ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल

बैलाच्या हल्ल्यात पीडित वृद्ध महिला मृत्यूशी देते झुंज 

या हल्ल्यात वंदना देवीकर यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली. तसेच मेंदूलाही जबर मार लागला आहे. त्यांना रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया केली. त्यांनी अद्यापही डोळे उघडलेले नाहीत आणि प्रतिसाद दिलेला नाही. या गंभीर घटनेनं रहिवाशांच्या संरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

महिना उलटून गेला तरी प्रकृती चिंताजनक

या संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. वंदना या घरात झाडू मारत होत्या, तेव्हा एका बैलाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. एक महिना उलटून गेला तरी, वंदना यांची प्रकृती चिंताजनकच आहे. त्या मृत्यूशी झुंझ देत आहेत. या घटनेनं महापालिकेचे कामकाज आणि नागरिकांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हल्ला करणारा बैल देखील त्याच परिसरात फिरत राहिल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. 

हे ही वाचा : नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पीडित महिला वंदना देवीकर अजूनही घरी बेडवर बेशुद्ध अवस्थेत आहे, तसेच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. तर दुसरीकडे मारहाण करणारा बैल रस्त्यावर मोकाट फिरताना दिसत असल्याचे वृत्त माध्यमाने दिले. महापालिकेने तातडीने भटक्या प्राण्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू करावी आणि पीडितेच्या कुटुंबाला पुरेशी भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे