Nagpur Fire News : नागपूर शहरातील महाल परिसरात शनिवारी (14 जून 2025) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जय कमल कॉम्प्लेक्समधील एका इलेक्ट्रिक सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत गोदाम मालक गिरीश खत्री (35) आणि कर्मचारी विट्ठल धोटे (25) यांचा मृत्यू झाला, तर गुणवंत नागपुरकर (28) गंभीर जखमी झाले. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
आग कशी लागली?
प्राथमिक माहितीनुसार, जुम्मा मशिदीजवळील आरके लाइट हाउस या इलेक्ट्रिक दुकानावरील गोदामात ही आग लागली. गोदामात हॅलोजन लाइट्स, फटाके आणि अन्य ज्वलनशील सामान ठेवलेलं होतं. याच सामानाने पेट घेतला असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >>भाचा आणि मामीमध्ये अनैतिक संबंध, मामी मामाला सोडून भाच्यासोबत पळाली! सोबत...
प्रत्यक्षदर्शींनुसार, गोदामात वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणगीमुळे फटाके आणि ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतला. काही मिनिटांतच आगीने संपूर्ण गोदामाला विळखा घातला. माहिती मिळताच चार अग्निशमन वाहनं घटनास्थळी दाखल झाली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आणि मोठ्या संख्येनं लोक जमल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली.
जय कमल कॉम्प्लेक्स ही जुनी निवासी आणि बाजार संकुल असलेली इमारत आहे. तळमजल्यावर दुकानं आणि वरच्या मजल्यांवर कुटुंबं राहतात. फटाक्यांचा साठा करणं अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं. पोलीस आणि अग्निशमन विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे ही वाचा >>आता 'यासाठी' हॉटेल भाग्यश्री बंद ठेवण्याचा घेतला मालकाने निर्णय!
दरम्यान, या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT
