नांदेड हादरलं! 6 वर्षीय चिमुरडी शिकवणीहून घरी जाताना 22 वर्षीय नराधमाने केले लैंगिक अत्याचार, नागरिकांकडून फाशीची मागणी

Nanded crime : नांदेडमध्ये माणुसकीला हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन चिमुरडीवर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

Nanded crime

Nanded crime

मुंबई तक

• 02:19 PM • 09 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीने तिला वाटेतच गाठलं आणि...

point

पोलीस ठाण्यात गर्दीचे चित्र 

point

नांदेड हादरलं!

Nanded Crime : नांदेडमध्ये माणुसकीला हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन चिमुरडीवर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या प्रकरणात संशयित तरुणाला फाशी द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसते. या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित चिमुरडीच वय अवघं 6 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

आरोपीने तिला वाटेतच गाठलं आणि...

ही संतापजनक घटना शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रोजी घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पीडित मुलगी ही सायंकाळीच्या सुमारास क्लास करून घरी परतत असताना आरोपीने तिला वाटेतच गाठलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनं नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच आता नागरिकांनी  आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. 

पोलीस ठाण्यात गर्दीचे चित्र 

या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या एकूण तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरोधात मुखेड पोलीस ठाण्यात (8 नोव्हेंबर) रोजी शनिवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेदरम्यान, नागरिकांनी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दीचे चित्र दिसून आले होते. 

हे ही वाचा : Govt Job: 'प्रसार भारती'मध्ये निघाली नवी भरती! 'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज...

पीडित मुलीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती देगलूरचे पोलीस अधीक्षक संकेत गोसावी यांनी दिली आहे. 

    follow whatsapp