Nandurbar News : धक्कादायक ! नंदुरबार सरकारी रुग्णालयात 179 बालकांचा मृत्यू, पालकांचा आक्रोश

मुंबई तक

17 Sep 2023 (अपडेटेड: 17 Sep 2023, 06:57 AM)

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात 179 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आरोग्य व्यवस्थेवरच सवाल केला जात आहे. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर मात्र पालकवर्गातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Child Death nandurbar civil hospital

Child Death nandurbar civil hospital

follow google news

Nandurbar News : महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये (Civil hospital) गेल्या तीन महिन्यांपासून 179 बालकांचा मृत्यू (Child death) झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) आरोग्य विभागाच्या कामावर अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. नवजात बालकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातून (Tribal area) बालकांना रुग्णालयात दाखल केले जाते, मात्र उपचाराविना बालकांचा मृत्यू होत असल्याने बालकांच्या मृत्यूने पालकांचा होणारा आक्रोश थांबणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. (nandurbar district civil hospital 179 children death 3 months rural and tribal area)

हे वाचलं का?

मृत बालकांचा आकडा धक्कादायक

नंदुरबारमध्ये जुलै महिन्यात 75, ऑगस्टमध्ये 86 तर सप्टेंबर महिन्यात 18 बालकांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार हा जिल्हा 15 हजार 582 चौ. कि.मी.मध्ये पसरलेला आहे. त्याच नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील 23 हजार बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामधील 179 बालकांचा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा >> Mumbai : घरात भांडण झालं अन् पब्लिक टॉयलेटमध्ये घेतला गळफास, अंधेरीतील घटना

पालकांचे बोट प्रशासनाकडे

बालकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबत अनेक सवाल उपस्थित केले गेले. त्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या मते राज्यातील सरासरी मृत्यूदर 25 टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील सरकार रुग्णालयात झालेला बालकांचा मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बालकांच्या मृत्यूवर पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यांनी प्रशासनाकडे बोट करत त्यांच्यावर आरोप केले आहेत.

हे ही वाचा >> Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?

उपकरणांचाही तुटवडा

नंदुरबारमधील 179 बालकांचा मृत्यू झाला असला तरी जुलै ते सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लहान मुले अधिक दगावली आहेत. रुग्णालयात व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा असल्यामुळेच बहुतांशी बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

    follow whatsapp