नाशिक : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. केवळ तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
प्राथमिक माहितीनुसार, डोंगराळे गावातील संशयित विजय संजय खैरनर (वय 24) याने घराजवळ खेळत असलेल्या या चिमुरडीला फुस लावून निर्जनस्थळी नेलं. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या डोक्यात मोठ्या दगडाने वार करत तिचा खून केला. या अत्यंत क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी आरोपी विजय खैरनर याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास जलदगतीने सुरू आहे. चिमुरडीचा मृतदेह अधिक तपासासाठी मालेगावच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत.
हेही वाचा : सांगली : लग्नास नकार दिला, मुलीच्या वडिलांवर तरुणाचा खुरप्याने हल्ला; झटापटीत मुलीचं बोट पूर्णपणे तुटलं
या भीषण घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. इतक्या लहान मुलीवर अशा प्रकारचा अमानुष अत्याचार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात येतोय. गावातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, महिलांवरील आणि लहान मुलांवरील अशा प्रकारच्या घटनांनी महाराष्ट्रात सर्वत्र चिंता वाढली आहे. समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत असून, अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. मालेगाव पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा नागरिकांना कायद्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे डोंगराळे गावात शोककळा पसरली आहे. केवळ तीन वर्षांच्या चिमुरडीचा अशा क्रूर पद्धतीने जीव घेण्यात आल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवर संताप आहे. आता या प्रकरणात तपास कसा पुढे सरकतो आणि आरोपीला कोणती शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी अनगरमध्ये दहशत? अर्ज भरु नये म्हणून पाठलाग; महिलेचे भाजप नेत्यावर आरोप
ADVERTISEMENT











