Neet Exam result : नीट परीक्षेचा निकाल केंद्र, शहरनिहाय जाहीर, कसा बघायचा?

मुंबई तक

20 Jul 2024 (अपडेटेड: 20 Jul 2024, 01:57 PM)

Neet Exam city, centre wise Result : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार एनटीएने नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शहर आणि केंद्र निहाय निकाल २० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला. 

नीट युजी परीक्षेचा एनटीएने शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केला आहे.

नीट परीक्षेचा शहर, केंद्रनिहाय निकाल घोषित करण्यात आला आहे.

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नीट युजी २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर

point

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निकाल प्रसिद्ध करण्यात आला

point

नीट युजी २०२४ परीक्षेचा निकाल कसा पहाल?

NEET UG 2024 Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. 2024 च्या नीट परीक्षेचा निकाल शहर आणि केंद्र निहाय जारी करण्यात आला आहे. एनटीएने संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध केला आहे. 

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला केंद्र आणि शहरनिहाय नीट युजी २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. नीट परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार निकाल जाहीर करण्यात आला. 

नीट परीक्षा निकाल कुठे बघाल? (nta official website)

एनटीने नीट युजी परीक्षेचा निकाल आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. नीटचा निकाल पाहण्यासाठी neet.nta.nic.in आणि nta.nic.in किंवा Exams.nat.ac.in या वेबसाईटला भेट द्या.

हेही वाचा >> लाडका भाऊ योजनेसाठी वेबसाइट सुरू 

नीट परीक्षेचा निकाल कसा चेक कराल?

- सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जा. (neet.nta.nic.in, nta.nic.in, Exams.nat.ac.in)

-होमपेजवर नीट, शहर, केंद्र निहाय निकाल यावर क्लिक करा. 

- नवीन पेज ओपन होईल. त्यावर राज्य आणि परीक्षा केंद्र निवडा.

- नंतर स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल. हे गुणपत्रक तुम्ही डाऊनलोड करू शकता. 

नीट परीक्षा वाद काय होता?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 5 मे 2024 रोजी नीट युजी परीक्षा घेतली होती. देशभरात 4750 केंद्रावर ही परीक्षा झाली होती. परीक्षेचा निकाल 4 जून रोजी घोषित करण्यात आला. या निकालावर शंका उपस्थित करण्यात आल्या. वाद झाल्यानंतर 23 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती, तर निकाल 30 जून रोजी जाहीर करण्यात आला होता.

हेही वाचा >> लाडका भाऊ योजनेचा जीआर करा डाऊनलोड, तरुणांनो पाहा पैसे कसे मिळतील! 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंठपीठाने असे म्हटले होते की, आम्ही एनटीएला निर्देश देतो की, नीट युजी २०२४ परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण प्रसिद्ध करावे, मात्र विद्यार्थ्यांची ओळख उघड करू नये. विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवली जावी. केंद्र निहाय बघायला हवे की गुणांचा पॅटर्न काय आहे.'