Ladka Bhau Yojana Website: लाडका भाऊ योजनेसाठी वेबसाइट सुरू, CM शिंदेंनी लिंकच दिली!

मुंबई तक

Maza Ladka Bhau Yojana Website: लाडका भाऊ योजनेसाठी आता सरकारने अधिकृत वेबसाईट लाँच केली आहे. ज्याची लिंक स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेअर केली आहे. पाहा या वेबसाइटवरून नेमका अर्ज कसा भरायचा ते.

ADVERTISEMENT

लाडका भाऊ योजनेसाठी वेबासाइट सुरू
लाडका भाऊ योजनेसाठी वेबासाइट सुरू
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडका भाऊ योजनेसाठी अधिकृत वेबासाइट सुरू

point

लाडका भाऊ योजनेमध्ये तरुणांना मिळणार हजारो रुपये

point

लाडका भाऊ योजनेसाठी करावा लागणार

Maza Ladka Bhau Yojana Online Form: मुंबई: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही आता  माझा लाडका भाऊ योजना  (Ladka Bhau Yojana Maharashtra 2024) या नावाने   प्रसिद्धीस आली आहे. आता याच योजनेबाबतची एक अत्यंत महत्त्वाची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. (ladka bhau yojana official website launched cm eknath shinde gave the link know in detail how to apply online)

राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकार 6 हजार ते 10 हजार रुपये विद्यावेतन देणार आहे. ज्यासाठी राज्यातील युवकांना नोंदणी करावी लागणार आहे. पण ही नोंदणी त्यांना ऑनलाइन करावी लागेल. ज्यासाठी सरकारने आता अधिकृत वेबसाइट देखील लाँच केली आहे. जाणून घ्या नेमकी कोणती वेबसाइट आणि अर्ज ऑनलाइन पद्धतीने कसा भरायचा.

हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana GR Download: लाडका भाऊ योजनेचा जीआर करा डाऊनलोड, तरुणांनो पाहा पैसे कसे मिळतील!

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते माझा लाडका भाऊ योजनेच्या म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना आणि उद्योग- व्यवसायांना आणि आस्थापनांना यावर नोंदणी करता येणार आहे.

Maza Ladka Bhau Yojana साठी ऑनलाइन अर्ज असा भरा! 

  1. सर्वप्रथम तुम्हाला 'माझा लाडका भाऊ योजना'च्या rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल
  2. वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. तुम्ही क्लिक करताच, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
  4. आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
  5. यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  6. शेवटी, तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे, तुम्ही माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे वाचलं का?

    follow whatsapp