Govt Job: ITI पास तरुणांनी मिळवा सरकारी नोकरी; 'या' पदांसाठी मोठी भरती... लवकर करा अप्लाय!

इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) कडून सीनियर आर्टिजनच्या एकूण 125 पदांसाठी भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

ITI पास तरुणांनी मिळवा सरकारी नोकरी... ECIL कडून मोठी भरती

ITI पास तरुणांनी मिळवा सरकारी नोकरी... ECIL कडून मोठी भरती

मुंबई तक

• 11:55 AM • 28 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ITI पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी

point

ECIL कडून मोठी भरती जाहीर

point

कसा आणि कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: आयटीआय (ITI) उत्तीर्ण झालेल्या तरुणांना प्रतिष्ठित सरकारी संस्थेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) कडून सीनियर आर्टिजनच्या एकूण 125 पदांसाठी भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ECIL च्या ecil.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. 

हे वाचलं का?

या पदासाठी अर्जाची प्रक्रिया 26 जून रोजी दुपारी 2 वाजता सुरु झाली असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

'या' पदांसाठी निघाली भरती

1. सीनियर आर्टिजन-सी (Cat-1): एकूण 120 पद

  • इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक – 50 पद
  • इलेक्ट्रिशियन – 30 पद
  • फिटर – 40 पद

2. सीनियर आर्टिजन-सी (Cat-2): एकूण 5 पद

  • इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक – 1 पद
  • इलेक्ट्रिशियन – 2 पद
  • फिटर – 2 पद

काय आहे पात्रता? 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र असायला हवं. याव्यतिरिक्त, संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव देखील असायला हवा. 

वयोमर्यादा

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सामान्य (Open) प्रवर्गातील उमेदवाराचं कमाल वय 30 वर्षे असायला हवं. तसेच ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी (SC)/ एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत 5 वर्षे सूट देण्यात आली आहे. 

हे ही वाचा: अडीच वर्षाच्या मुलाला दाम्पत्यांकडून चटके आणि वेताचे फटके, कारण ऐकून थक्का व्हाल

किती मिळेल पगार? 

या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना ECIL कडून 23,368 रुपये मासिक वेतन मिळेल. ही वेतनश्रेणी नोकरीची सुरक्षा आणि सरकारी सुविधांसह एक चांगलं पॅकेज मानली जाऊ शकते.

कशी होईल निवड? 

आयटीआय (ITI) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अर्जदारांची 1:4 च्या प्रमाणात निवड केली जाईल. जर दोन किंवा अधिक उमेदवारांचे ITI मधील गुण समान असतील तर 10 वीच्या मार्क्सच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 

हे ही वाचा: Personal Finance: तुमचं महिन्याचं बजेट असं बनवा, मौजमजाही होईल आणि प्रचंड Investment सुद्धा!

कधी आणि कसा कराल अर्ज? 

इच्छुक उमेदवार ECIL च्या ecil.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे सर्व खबरदारी बाळगून लक्षपूर्वक अर्ज भरणं आवश्यक आहे. 


 

    follow whatsapp