Govt Job: रेल्वेत पॅरामेडिकल स्टाफसाठी बंपर भरती; नर्सिंग, फार्मसीच्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी...

रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून पॅरामेडिकल स्टाफसाठी एकूण 403 पदांसाठी भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन लवकरच जाहीर केलं जाणार आहे.

रेल्वेत पॅरामेडिकल स्टाफसाठी बंपर भरती

रेल्वेत पॅरामेडिकल स्टाफसाठी बंपर भरती

मुंबई तक

• 12:28 PM • 26 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रेल्वे भरती बोर्डाकडून नव्या भरतीचं नोटिफिकेशन

point

पॅरामेडिकल स्टाफसाठी बंपर भरती

point

कशी होणार भरती?

RRB Recruitment: पॅरामेडिकल उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून पॅरामेडिकल स्टाफसाठी एकूण 403 पदांसाठी  भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन लवकरच जाहीर केलं जाणार आहे. जुलै किंवा ऑगस्ट 2025 मध्ये या भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. 

हे वाचलं का?

'या' पदांसाठी भरती

या भरतीअंतर्गत नर्सिंग अधीक्षक, फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, लॅब असिस्टंट, ईसीजी टेक्निशियन, रेडिओग्राफर, स्वास्थ्य आणि मलेरिया निरीक्षक सारखी बरीच महत्त्वाची पदं भरली जाणार आहेत. बीएससी नर्सिंग, नर्सिंग डिप्लोमा किंवा फार्मसी डिप्लोमा यांसारखी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. 

निवड प्रक्रिया

रेल्वे भरती बोर्डाची या भरतीसाठी कंप्यूटर आधारित परीक्षा (CBT) च्या माध्यामातून परीक्षेचं आयोजन करण्यात येईल. यामध्ये परीक्षार्थींना सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि पॅरामेडिकल विषयाशी संबंधित प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेश आणि मेडिकल टेस्टच्या माध्यमातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. परीक्षेच्या तारखा आणि डिटेल्ड अभ्यासक्रम लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. 

हे ही वाचा: मर्सिडीज उलटली, 9 एअर बॅघ उघडल्या, तरी बड्या उद्योजकाचा मृत्यू; समृद्धीवर भीषण अपघात

यावेळी रेल्वे भरती बोर्डाकडून पॅरामेडिकलच्या एकूण 403 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये नर्सिंगच्या सर्वात जास्त म्हणजेच 246 जागा भरल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त, फार्मासिस्टच्या 100 जागा, स्वास्थ्य आणि मलेरिया निरीक्षकच्या 33 जागा, लॅब असिस्टंट ग्रेड-II च्या 12 जागा, डायलिसिस टेक्निशियनच्या 4 जागा, ईसीजी टेक्निशियनच्या 4 जागा आणि रेडिओग्राफरच्या 4 जागांचा समावेश आहे. 

हे ही वाचा: खळबळजनक! क्रिकेटचा वाद टोकाला पोहचला... विद्यार्थ्याने शाळेतच केले चाकूने वार अन्...

या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) www.rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. इच्छुक उमेदवारांना वेळोवेळी वेबसाइट तपासत राहण्याचा आणि नोटिफिकेशन जाहिर होताच अर्जाची प्रक्रिया सुरु करण्याचा सल्ला दिला जात आहे. 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज तपशीलवार अर्ज भरून अर्जाचं शुल्क भरा. अर्जाची शेवटची ताऱीक आणि परीक्षेच्या तारखा अधिकृत नोटिफिकेशनच्या माध्यामातून जाहीर केल्या जातील. त्यासोबत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वेमार्फत निर्धारित वेतन आणि भत्ते तसेच सुविधा मिळतील. 

    follow whatsapp