Bihar News: मोठ्या भावाने माहेराहून बायकोला परत सासरी आणण्यासाठी आपल्या लहान भावाला पाठवले. मात्र, लहान भावानेच मोठा धोका दिल्याची बाब समोर आली आहे. तो स्वत:च आपल्या वहिनीला घेऊन पळून गेल्याची महिती मिळताच गावातील सगळे लोक आणि नातेवाईक चकित झाले. नेमकी घटना काय? जाणून घ्या.
ADVERTISEMENT
बिहारमधील बांका जिल्याह्यातील अमरपुर पोलीस स्टेशन परिसरात एक वेगळीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. या परिसरातील डुमरामा गावातील एक तरुण मुलगा आपल्याच वहिनीसोबत पळून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. आपला मोठा भाऊ गुजरातमध्ये मोलमजुरी करत असल्याचं नणंदेनं त्यावेळी पोलिसांना सांगितलं.
गुजरातमध्ये कामासाठी असलेल्या भावाने आपल्या लहान भावाला काही दिवसांपूर्वी फोन केला होता आणि त्यावेळी त्याने आपल्या लहान भावाला सांगितलं की "घरातील कामं करण्यासाठी आणि बाकीची परिस्थिती सांभाळण्यात अडचण येत असल्यामुळे तु तुझ्या वहिनीला माहेरहून परत आपल्या घरी आण." आईने सुद्धा आपल्या लहान मुलाला मोठ्या सूनेला आणण्यासाठी तिच्या माहेरी पाठवले.
हे ही वाचा: मुलीच्या सासूसोबत गेला पळून! सासरी परतल्यानंतर आला मोठा ट्विस्ट... नेमकं काय घडलं?
रस्त्यातच दिर आणि विहिनी फरार..
लहान भाऊ मोठ्या भावाच्या बायकोला म्हणजेच आपल्या वहिनीला आणण्यासाठी माहेरी गेला. तिच्या माहेरी गेल्यानंतर तो एक दिवस तिथे थांबला आणि दुसऱ्या परत सासरी येत असताना रस्त्यातच ते दोघे पळून गेल्याचा आरोप केला जात आहे. नातेवाईकांनी सुद्धा त्या दोघांचा खूप तपास केला मात्र याबद्दल कोणताच पुरावा त्यांना सापडला नाही. या घटनेनंतर मुलीच्या नणंदेनं अमरपुर पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली. यामध्ये भावावर आपल्या वहिनीला फसवून तिला पळवून घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा: ओठ, अंडरआर्म्स, प्रायव्हेट पार्टची 7 वेळा सर्जरी, सेक्स रॅकेट चालवणारी लोलाचा सगळं गुपितच...
पोलिसांनी केली दोघांची चौकशी
पोलीस अधिकारी पंकज कुमार झा यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. लवकरच पळून गेलेल्या दोघांचं लोकेशन ट्रेस करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणामुळे गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. नातेवाईक आणि गावातील लोकांना लहान भाऊ आपल्याच वहिनीसोबत पळून गेल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. पोलिससुद्धा या घटनेकडे गांभीर्याने पाहता लवकरच कारवाई करण्याकडे पाऊल उचलत आहेत.
ADVERTISEMENT
