सासूचे सुनेच्या वडिलांसोबत अनैतिक संबंध, एकदा नव्हे तर तब्बल दोनदा केला कांड..
मध्य प्रदेशातील अलिराजपूरमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीच्या सासूसोबत, म्हणजेच स्वतःच्या व्याहीसोबत पळून गेल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आपल्याच मुलीच्या सासूसोबत गेला पळून!

सासरी परत आल्यानंतर नातेवाईकांकडून...

मध्य प्रदेशातील अनोखं प्रेम प्रकरण
MP News: नातेसंबंधांचा विचार न करता प्रेमात वेडं झालेल्या सासू-जावई, दाजी-मेव्हणी आणि दीर-वहिनी यासारख्या अनेक लव्ह स्टोरीच्या चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळालं. अशीच एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूरमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीच्या सासूसोबत, म्हणजेच स्वतःच्या व्याहीसोबत पळून गेल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे. समाजातील लोकांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते आणि दोघांनाही एकमेकांसोबत राहायचे होते. याच कारणामुळे त्यांनी समाजाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केला. आता त्या दोघांच्या प्रेम प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप थावलिया नामक व्यक्तीच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी एकत्र येऊन यावर विचार केला आणि समंजसपणा दाखवला. त्यानंतर प्रताप यांची मुलगी अगदी आनंदाने सासरी नांदू लागली. आपल्या मुलीला भेटण्यासाठी प्रताप यांचं व्याह्यांच्या घरी येणं जाणं वाढू लागलं.
समाजाची पर्वा न करता एकमेकांसोबत पळून गेले
याच दरम्यान, मुलीची सासू आणि प्रताप यांचे प्रेमसंबंध सुरु झाले. याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र, त्यांचे प्रेमसंबंध इतके वाढले की समाजातील कोणाचीही पर्वा न करता ते एकमेकांसोबत पळून गेले.
हे ही वाचा: सांगलीत खळबळ! पतीने कसलाही विचार न करता पत्नीच्या डोक्यात बांबूनं केला हल्ला अन्...
वडील आपल्याच मुलीच्या सासूसोबत पळून गेल्यामुळे त्या दोघांवर सामाजिक दबाव टाकून त्यांना पुन्हा घरी बोलावण्यात आलं. त्यानंतर 1 लाख 30 हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांना दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यात आलं. मात्र, ते दोघे प्रेमात इतके आंधळे झाले होते की मुलीचे वडील पुन्हा आपल्या मुलीच्या सासूसोबत गुजरातला पळून गेले.