BPCL Recruitment: जास्त पगार, भत्ते आणि नोकरीच्या सुरक्षिततेमुळे बरेच तरुण सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असतात. अशा उमेदवारांसाठी एका नव्या आणि मोठ्या भरतीची जाहिरात जाहीर झाली असल्याची बातमी समोर आली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कडून कंपनीच्या जूनियर एक्झिक्युटिव्ह आणि एसोसिएट एक्झिक्युटिव्ह सारख्या बऱ्याच पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी इच्छुक उमेदवार bharatpetroleum.in या BPCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
पदांसाठी शैक्षणिक पात्रता
जूनियर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग): मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रूमेन्टेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल किंवा केमिकल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग): B.Tech, BE किंवा BSc (इंजीनियरिंग) करणारे उमेदवार या पदासाठी पात्र असतील.
जूनियर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स): या पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्यूएशन सोबत इंटर इंटर CA किंवा इंटर CMA करणं आवश्यक आहे.
असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अश्योरन्स): या पदासाठी MSc (केमिस्ट्री) मध्ये डिग्री असणं गरजेचं आहे. विशेषत: ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक, फिजिकल किंवा अॅनालिटिकल केमिस्ट्री मध्ये डिग्री असायला हवी.
सेक्रेटरी: या पदासाठी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असण्यासोबत पदवीधर असणं अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी किमान 30 वर्षे आणि कमाल 35 वर्षे वय असणं आवश्यक आहे. तसेच, OBC, SC/ST उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
हे ही वाचा: पुरुषांचा स्पर्म काऊंट कमी झालाय? टेन्शन नॉट तरीही व्हाल बाबा, शास्त्रज्ञांनी केलं संशोधन
वेतन
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी वेतन: 30,000 ते 1,20,000 रुपये प्रति महिना (वार्षिक पॅकेज सुमारे 11.86 लाख रुपये)
असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी वेतन: 40,000 ते 1,40,000 रुपये प्रति महिना (वार्षिक पॅकेज सुमारे 16.64 लाख रुपये)
निवड प्रक्रिया
या पदासाठी सर्वात आधी पात्रता आणि अनुभवाच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केली जाईल. यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. यानंतर, केस-बेस्ड डिस्कशन, ग्रुप टास्क आणि मुलाखतीच्या माध्यमातून अंतिम निवड केली जाईल.
अर्ज करण्यासाठी शुल्क
जनरल (Open), OBS आणि EWS प्रवर्गासाठी: 1000 + 180 (GST). तसेच SC, ST, PwBD प्रवर्गासाठी कोणतेच शुल्क आकारले जाणार नाही.
ADVERTISEMENT
