Govt Job: देशातील अनेक तरुणांचं भारतीय दलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याचं स्वप्न असतं. भारतीय तटरक्षक दलात आपलं योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन कोस्ट गार्ड (ICG) कडून 2025 वर्षातील, सेलर (जनरल ड्यूटी, डोमेस्टिक ब्रांच) आणि मेकॅनिकल पदांसाठी एकूण 630 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी 11 जून 2025 पासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 25 जून 2025 पर्यंत joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
कोणत्या पदांसाठी भरती?
CGEPT-01/2026: यामध्ये सेलर (GD) साठी 260, मेकॅनिकल साठी 30, इलेक्ट्रिकल साठी 11 आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी 19 पदे आहेत.
CGEPT-02/2026: यामध्ये, सेलर (GD) च्या 260 पदे आणि डोमेस्टिक ब्रँचच्या 50 पदांचा समावेश आहे.
अशाप्रकारे एकूण 630 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
काय आहे पात्रता?
1. सेलर (जनरल D): गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह 12 वी उत्तीर्ण
2. सेलर (डोमेस्टिक ब्रांच): कोणत्याही बोर्डातून 10 वी उत्तीर्ण
3. मेकॅनिकल (सर्व ट्रेड्स): 10 वी/ 12 वी उत्तीर्ण असण्यासोबत AICTE मधून मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित अभियांत्रिकी ट्रेडमध्ये 2 ते 4 वर्षांचा डिप्लोमा
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 22 वर्षांच्या दरम्यान असावे. बॅच आणि पदानुसार पात्रता निश्चित करण्यात आली असून याची अधिक माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल.
हे ही वाचा: Air India Crash: 10 बाय 10 चं घर ते जग जिंकण्याचं स्वप्न, डोंबिवलीची रोशनी जे बोलली ते करून दाखवलं पण...
वेतन आणि भत्ते
- सेलर (GD/DB): मूळ वेतन 21,700 रुपये प्रति महिना (पे लेव्हल-3)
- मेकॅनिकल: 29,200 मूळ वेतन (पे लेव्हल-5) + 6,200 मेकॅनिकल भत्ता + इतर सरकारी भत्ते
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- शारीरिक क्षमता चाचणी (PET)
- डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
- मेडिकल तपासणी
अर्जाचे शुल्क किती?
या भरतीसाठी उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरावे लागेल. सामान्य (General)/ओबीसी (OBC)/ईडब्ल्यूएस (EWS) श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागतील. तर एससी (SC)/एसटी (ST) श्रेणीतील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
हे ही वाचा: Ahmedabad Air India crash: अहमदाबाद विमान अपघातात हादरवून टाकणारा मृतांचा नेमका आकडा आला समोर
महत्त्वाच्या तारखा
1. अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 11 जून 2025
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025
ADVERTISEMENT
