Ahmedabad Air India crash: अहमदाबाद विमान अपघातात हादरवून टाकणारा मृतांचा नेमका आकडा आला समोर

मुंबई तक

Ahmedabad Air India crash : अहमदाबादमध्ये विमान अपघातात मोठं नुकसान झालं आहे. या अपघातात 12 जूनपर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. मृतांचा आकडा 265 वर गेला आहे.

ADVERTISEMENT

Ahmedabad Air India crash In death toll rises to 265
Ahmedabad Air India crash In death toll rises to 265
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एअर इंडियाच्या AI-171 विमानाचा 12 जून रोजी अपघात

point

विमान अपघातात मृतांच्या संख्येत वाढ

Ahmedabad Air India crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघाताची दुर्देवी घटना घडली आहे. एअर इंडियाच्या AI-171 विमानाचा 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी अपघात झाला. या अपघातात एकूण 230 प्रवासी होते, तसेच 12 क्रू मेंबर्सचाही समावेश होता. कालपर्यंत म्हणजेच 12 जूनपर्यंत मृतांचा आकडा हा 141 होता. आज 13 जून रोजी मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. मृतांचा आकडा हा अडीचशे पार म्हणजेच 265 वर पोहोचला आहे. मृतांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : Ahmedabad Air India Crash: अपघातात राज्यातील सहा क्रू मेंबर्सचा मृत्यू, सुनील तटकरेंच्या नातेवाईकाचाही समावेश

अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान शहरातील मेघाना भागात कोसळले. यामुळे शहरात अग्नीतांडव माजून धुराचे लोट पसरले आणि तात्काळ आपत्कालीन मदत सुरु करण्यात आली. दरम्यान, वाहतूक महासंचालनालयाने विमानात 242 जणांचा समावेश होता. ज्यामध्ये 230 प्रवासी आणि 2 पायलेट आणि 10 कॅबिन क्रू मेंबर्सचा समावेश आहे. मात्र, मृत्यूच्या संख्येत आणखी वाढ होईल असे बोलले जात आहे. 

लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी विमानात अधिक इंधनाचा साठा करून ठेवल्याने विमानाने पेट घेतला आणि आगीच्या तीव्रतेत वाढ झाली, अशी माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी माहिती दिली. या घटनेनं केवळ अहमदाबादच नाही,तर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

विमानतळाच्या क्वार्टरच्या जवळील लोक जखमी 

अहमदाबादच्या मेघानीनगर भागातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या निवासस्थानी विमान कोसळले आणि आगडोंब उसळला. धुरांचे लोट पसरू लागले असून यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. विमानतळाच्या क्वार्टरच्या जवळ राहणारे अनेक लोक हे गंभीर जखमी झाले आहेत, मात्र, यावर अधिकृतरित्या माहिती दिली नसल्याचे वृत्त माध्यमांनी सांगितले नाही. 

हेही वाचा : 'मला जिवंत असल्याचा विश्वासच...' विमान अपघातात बचावलेल्या प्रवाशाने सांगितला घटनाक्रम
 

मृतांच्या आकड्यात वाढ

काही वृत्तमाध्यमांनी 241 प्रवाशांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र, त्या अपघातात आता वाढ होऊ लागली आहे. 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp