Govt Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) या मोठ्या सरकारी बँकेकडून 'मॅनेजर'च्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
115 पदांसाठी भरती
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofindia.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदाच्या 115 जागांवर भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रोफेशनल नॉलेज आणि अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्जदारांची संख्या लक्षात घेऊन नियुक्तीसाठी टप्पे ठरवले जातील. यासाठी 125 गुणांची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे आणि यासाठी 100 मिनिटांचा कालावधी असेल.
हे ही वाचा: मुंबई: सूटकेसमध्ये 'त्या' अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह... डोंबिवलीतील खळबळजनक घटना!
अर्जाचं शुल्क
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना प्रवर्गानुसार, अर्जाचं शुल्क भरावं लागेल. यामध्ये एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. जनरल (Open) आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल.
हे ही वाचा: अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू; पती अन् मुलंही जखमी
कसा कराल अर्ज?
1. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम bankofindia.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, होमपेजवरील 'Recruitment' सेक्शनमध्ये जाऊन 'Officers Recruitment 2025' लिंकवर क्लिक करा.
3. आता नोटिफिकेशन उघडून पात्रता तपासा.
4. ऑनलाइन अर्जाची लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
5. माहिती भरल्यानंतर, डॉक्यूमेंट्स आणि फोटो तसेच सही योग्यरित्या अपलोड करा.
6. नंतर, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
7. भविष्यासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT











