Jalna crime : जालन्यात गेल्या काही दिवसांपासून खूनाच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत. अशातच आता जालन्यात माजी सरपंचावर तलवारीने सपावर वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. हत्या झालेल्या सरपंचाचे नाव बाबासाहेब सदाशिव सोमधाणे (वय अंदाजे 42 वर्ष) असे आहे. भर रस्त्यात बाबसाहेब सोमधाणे यांच्यावर टाटा सुमोमधून आलेल्या चौघांनी तलवारीने हल्ला केला. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी घडली. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Dharmendra Passed Away : अलविदा धर्मेंद्रजी! वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
जुन्या वादातून माजी सरपंचाची हत्या
या हत्येमागेचं कारण आता समोर आलं आहे. जुन्या वादातून देऊळगावचे माजी सरपंच बाबासाहेब सोमधाने यांची चौघांनी मिळून हत्या केली. जालना शहरातील जांगडे पेट्रोल पंपासमोर आरोपींनी सोमधाणे यांना एकटे गाठून त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी असलेल्यांनी हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.
चौघांनाही अटक
ही घटना घडल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांनाही अटक केली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्यांची नावे आता समोर आलेली आहे. मनोहर उर्फ बळीराम मच्छिंद्र सोमधाणे, अर्जुन मच्छिंद्र सोमधाणे, मच्छिंद्र साहेबराव सोमधाणे आणि सचिन मारुती गाडेकर अशी अटकेत असलेल्या आरोपींची ओळख समोर आली आहे. चौघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा : श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका; आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी टाहो फोडला
संबंधित प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावलर व्हायरल होत आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ADVERTISEMENT











