Govt Job: पदवीधरांसाठी भारतीय निवडणूक आयोगात भरती! पगार तर... कुठे आणि कधीपर्यंत कराल अर्ज?

भारतीय निवड आयोगात तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL)कडून डाटा एन्ट्री पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

पदवीधरांसाठी भारतीय निवडणूक आयोगात भरती!

पदवीधरांसाठी भारतीय निवडणूक आयोगात भरती!

मुंबई तक

• 01:19 PM • 21 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांसाठी भारतीय निवडणूक आयोगात भरती!

point

कुठे आणि कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: पदवीधरांसाठी कंप्यूटर आधारित सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय निवड आयोगात तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL)कडून डाटा एन्ट्री पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या नव्या भरतीचं विस्तृत नोटिफिकेशन  www.becil.com या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झालं असून उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

कंप्यूटरशी संबंधित नोकरीत रस असलेले आणि प्रतिष्ठित नोकरीच्या शोधात असलेले तरुण या डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करू शकतात. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून निवडणूक आयोगात करिअर घडवण्याच्या दृष्टीने ही भरती महत्त्वाची मानली जाते. या भरतीसाठी उमेदवार 5 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. 

हे ही वाचा: अहिल्यानगर : शाळेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचा 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार

काय आहे पात्रता? 

निवडणूक आयोगाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, उमेदवारांना संगणकाचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. विशेषत: MS Excel वरील कामाची जाण त्यांना असायला हवी. यासोबतच, उमेदवारांकडे किमान प्रति मिनिट 35 शब्द इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि अर्जदाराचां कमाल वय 35 वर्षे असणं अनिवार्य आहे. 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 24,356 रुपये पगार दिला जाईल. 

हे ही वाचा: बीड: ब्युटीपार्लरला जाते म्हणून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी गरोदर; पीडितेच्या अपहरणकर्त्यास अटक

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. 
2. सर्वप्रथम अधिकृत नोटिफिकेशनमधील अर्जाचा फॉर्मेट डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या. 
3. त्यामध्ये तुमची सर्व आवश्यक माहिती भरा. 
4. अर्जासोबत उमेदवारांनी शिक्षण/ व्यावसायिक प्रमाणपत्र, दहावी प्रमाणपत्र/ जन्माचा दाखला, जातीचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास), पॅन कार्ड, आधार कार्ड, ईपीएफ/ ईएसआयसी कार्ड यांच्या फोटोकॉपी जोडा. 
5. त्यानंतर, अर्जाचं शुल्क भरताना त्याच्या डिमांड ड्राफ्टची प्रत, तारीख आणि शुल्काची माहिती द्या. 
6. शेवटी, आवश्यक दस्ताऐवजांसह हा अर्ज ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL)च्या पत्त्यावर पाठवा. 

    follow whatsapp