Govt Job: ‘इंजिनीयरिंग’ची डिग्री प्राप्त उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! त्वरीत करा अर्ज...

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) कडून टेक्निकल अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंजिनीयरिंग’ची डिग्री प्राप्त उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

इंजिनीयरिंग’ची डिग्री प्राप्त उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मुंबई तक

• 05:27 PM • 21 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंजिनीयरिंग’चं शिक्षण घेतलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

point

काय आहे पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख?

Govt Job: अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनीयरिंग पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) कडून टेक्निकल अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 सप्टेंबर 2025 पर्यंत ecil.co.in या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

हे वाचलं का?

कंपनीने एकूण 160 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 65 रिक्त जागा सामान्य (Open) प्रवर्गासाठी, 16 रिक्त जागा ईडब्ल्यूएस (EWS) साठी, 43 रिक्त जागा ओबीसी (OBC) साठी, 24 जागा एससी (SC) साठी आणि 12 एसटी (ST) प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 सप्टेंबर रोजी सुरू झाली. उमेदवार उद्यापर्यंत अर्ज करू शकतात. टेक्निकल अधिकारी पदासाठी आवश्यक असलेली पात्रता आणि निवड प्रक्रिया जाणून घेऊया.

हे ही वाचा: लिव्ह-इन-पार्टनरसोबत ‘त्या’ कारणावरून वाद पेटला! आधी निर्घृण हत्या, नंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत...

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 60 टक्के गुणांसह ECE/ ETC/ E&I/ इलेक्ट्रॉनिक्स/ EEE/ इलेक्ट्रिकल/ CSE/ IT/ मेकॅनिकल शाखेत BE किंवा BTech पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. याशिवाय ओबीसी, एससी आणि एसटीसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट देखील उपलब्ध आहे.

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल... कुठून कुठपर्यंत असेल रूट? बीएमसीची नवी अपडेट

कसा कराल अर्ज?  

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम ecil.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवरील करिअर सेक्शनमध्ये जा.
  • तिथे ‘टेक्निकल अधिकारी पदांसाठी अप्लाय’ लिंकवर क्लिक करा.
  • आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून झाल्यानंतर फॉर्म भरून घ्या.
  • नंतर, मागितलेले डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

अर्जदारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे मेरिटच्या माध्यमातून केली जाईल. निवड एका वर्षासाठी कराराच्या आधारावर केली जाईल. पदावरील कामगिरीच्या आधारावर करार चार वर्षांपर्यंत वाढवता येईल.

    follow whatsapp